20 September 2020

News Flash

चिमुकल्यांचं पोट भरतोय ‘कम्युनिटी फ्रिज’

महिला डॉक्टरचा पुढाकार

भारतात आजही अनेक मोठ्या शहरांमध्येही उपासमार ही मोठी समस्या आहे. हजारो जण असे आहेत ज्यांच्यावर रिकाम्यापोटी झोपण्याची वेळ येते. शासनातर्फे यासाठी विविध योजन्या राबविल्या जातात, अनेक स्वयंसेवी संस्थाही गरीबांना अन्न देण्यामध्ये आघाडीवर असतात. मात्र तरीही ही परिस्थिती फारशी सुधारल्याचे दिसत नाही. समाजातील प्रत्येक घटकाची यामध्ये महत्त्वाची भूमिका असते.

चेन्नईमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना जेवण मिळावे यासाठी एका महिला डॉक्टरने पुढाकार घेतला आहे. डॉ. ईसा फातिमा जस्मिन यांनी यासाठी चेन्नईमध्ये कम्युनिटी फ्रिज बसवला आहे. बेसंत नगरमधील टेनिस क्लब येथे हा फ्रिज बसविण्यात आला आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉ. ईसा म्हणाल्या, आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज काही ना काही अन्न उरलेले असतेच जे काही वेळेस वाया जाते. सुरुवातीला असे उरलेले अन्न मी माझ्याघराबाहेर बसलेल्या महिलेला देत असे. कालांतराने माझ्या असे लक्षात आले की असे गरजू अनेकजण असतील ज्यांना अशा अन्नाचा फायदा होईल.

मला स्वतःला दान करायला आवडतेच पण दुसऱ्यांना त्याविषयी विचारायला मला संकोच वाटतो असेही त्या म्हणाल्या. यामध्ये मी स्वतः अन्न ठेवते आणि इतरांना या फ्रिजचा वापर करावा असे आवाहन त्या करतात. या फ्रिजला त्यांनी एका तमिळी कवितेचे अतिशय उत्तम नाव दिले आहे. त्याचा अर्थ ‘तुम्ही खाण्याआधी ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत अन्न वाटून घ्या.’ या अन्नाची योग्य ती खात्री पटावी त्यासाठी याठिकाणी लेबल सिस्टीमही कऱण्यात आली आहे. प्रत्येक अन्न ठेवताना ते कसे तयार केले आणि त्याची एक्स्पायरी डेट लिहायची आहे. यामध्ये फळांपासून ते घरात तयार करण्यात आलेल्या अन्नापर्यंत सर्व गोष्टी ठेवता येणार आहेत. हा फ्रिज सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याठिकाणी सर्व गोष्टींची योग्य ती नोंद रहावी यासाठी सुरक्षारक्षकही ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोलकाता येथेही नुकतेच एका हॉटेलच्या मालकाने आणि काही स्वयंसेवी संस्थांनी मिळून एकत्र येऊन अशाचप्रकारचा उपक्रम सुरु केला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 5:43 pm

Web Title: woman doctor runs the project of community fridge in chennai
Next Stories
1 Viral Video : ‘हा’ व्हिडिओ जरा जपूनच पाहा
2 Viral Video : …आणि मित्राच्या मदतीसाठी त्याने लढवली ‘ही’ शक्कल
3 Video : पत्रकाराच्या धाडसाने वाचले ट्रक ड्रायव्हरचे प्राण!
Just Now!
X