News Flash

Viral Video : तरुणींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या रोडरोमिओला महिलेने शिकवला धडा

ट्रेनमध्ये तिचे व्हिडिओ काढत होता

(छाया सौजन्य : Uma Mageswari )

खरंतर स्त्री, पुरुष बरोबरीचे दिवस आहेत. आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करून आपले कर्तृत्त्व गाजवत आहेत. तरीही समाजामध्ये काही लोकांकडून स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. काहींची मानसिकताच इतकी हिन असते की तोकड्या कपड्यातील महिला दिसली की तिच्याकडे बघत बसायचं किंवा मोबाईल काढून त्याचं चित्रीकरण तरी करायचं. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एकमेकांच्या जवळ उभ्या असलेल्या एका जोडप्याची व्हिडिओ क्लिप काढून ती व्हायरल करण्यात आली होती. असे प्रकार दर दिवसाआड घडताहेत. लक्ष नसताना एखाद्या महिलेचे चित्रीकरण करायचं आणि ती क्लिप व्हायरल करायची असे प्रकार वारंवार घडत आहे. पण काही महिला खूप धाडसी असतात, अशा रोडरोमिओला अद्दल कशी घडवायची हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. अशा एका रोडरोमिओला तरूणीने चांगलाच धडा शिकवला आहे.

हा माणूस मेट्रोमध्ये तिच्या समोरच्या सीटवर बसला होता. आणि आपल्या मोबाईलमधून तिचे चित्रीकरण करत होता. त्यातूनही तिला कळू नये म्हणून त्याने मोबइल असा ठेवला की जणू आपण मोबाइलमध्ये काहीतरी बघत आहोत. पण मेट्रोच्या काचांतून मोबाइलमध्ये नक्की काय सुरू आहे याचे प्रतिबिंब दिसत होते. तेव्हा समोर असलेल्या महिलेला हा प्रकार लगेच लक्षात आला आणि तिने आपला मोबाईल बाहेर काढून त्यांच्या या कृत्याचा पर्दाफाश केला. तिने या माणसाचे रेकॉर्डिंग करून आपल्यासोबत घडलेला प्रकार फेसबुकवर शेअर केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:44 pm

Web Title: woman exposes man who is secretly filming her in metro
Next Stories
1 Viral : कोण आला रे! कोण आला! सोशल मीडियावर ‘बॉडीगार्ड’ आला
2 सामान्य मुलाशी लग्नासाठी जपानच्या राजकन्येकडून पदत्याग!
3 Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात १२ महिने फळं देणारं आंब्याचं झाड
Just Now!
X