01 March 2021

News Flash

नवव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतरही महिला उठून चालू लागली, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला नवव्या मजल्यावरुन खाली पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे नवव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतरही महिला काहीच न झाल्याप्रमाणे उभी राहून चालू लागते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले असून आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहीजण तर ही महिला एलियन असल्याचा दावा करत आहेत. हा व्हिडीओ रशियामधील आहे.

३२ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत २७ वर्षीय महिला इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन खाली पडताना दिसत आहे. खिडकीत काही काम करत असताना महिलेचा तोल जातो आणि खाली साचलेल्या बर्फात पडते. इतक्या उंचीवरुन खाली पडल्यानंतर महिला गंभीर जखमी झाली असेल असं वाटणं साहजिक आहे. पण असं काहीच होत नाही. महिला काहीच न झाल्यासारखी उभी राहते आणि शांतपणे चालत तेथून निघून जाते.

हा व्हिडीओ १५ हजाराहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी तर आपला डोळ्यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान काहीजणांनी ट्विटमध्ये महिलेला काही अंतर्गत जखमा झाल्या असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 12:48 pm

Web Title: woman falls from ninth floor and walks away in russia viral video sgy 87
Next Stories
1 10 वर्षाच्या मुलामुळे 13 वर्षांची मुलगी झाली गरोदर, डॉक्टरही हैराण; TV शोमध्ये सांगितली घटना
2 बायको जीव घेईल माझा…इशांत शर्मा असं का म्हणाला असेल?? जाणून घ्या…
3 दोन्ही पाय नसतानाही त्याने खांबावर चढून केलं ध्वजारोहण, आनंद महिंद्रांनी ट्विट केला व्हिडीओ
Just Now!
X