स्विमिंग पूलमध्ये तरंगत असलेल्या निळ्या कारचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकदा महिलांच्या गाडी चालवण्याच्या कौशल्यावर टीका केल्या जातात, महिलांना गाडी व्यवस्थित चालवता येत नाही असं म्हणून नेहमीच त्यांची थट्टा केली जाते, हा फोटो म्हणजे त्याचं ताजं उदाहरण आहे असं सांगत अनेकांनी यावर तोंडसुख घेतलं आहे.

Video : राजघराण्यातील सासू-सुनेचा हायव्होल्टेज ड्रामा कॅमेरात कैद !

हा फोटो फ्लोरिडातला असून फ्लोरिडा कंट्री शेरिफ ऑफिसच्या अधिकृत फेसबुक पेजवरून तो शेअर करण्यात आला आहे. संबधित महिला आपली कार सुरू ठेवूनच गेली होती. गाडीत तिची लहान मुलगी आणि नवरादेखील होता. पैसे विसरल्यानं ती गाडी सुरू ठेवून धावत घरात गेली पण उतारामुळे तिची गाडी घरंगळत थेट घराच्या शेजारी असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये जाऊ पडली. गाडीसोबत तिचा नवरा आणि मुलगीदेखील स्विमिंग पूलमध्ये गेले. सुदैवानं त्यांना यात कोणतीही इजा झाली नाही. त्यांना स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्यात आलं मात्र कार पूलमध्ये पडल्यानं तिचं खूपच नुकसान झालं.

वाचा : ‘त्या’ बॅगवर मुंबईचं नाव थोडक्यात लिहिणं आजींना पडलं महाग, विमानतळावर एकच गोंधळ