News Flash

८४० तास मेहनत घेऊन तरुणीकडून नरेंद्र मोदींसाठी स्पेशल गिफ्ट!

या कलाकृतीचे वजन आहे तब्बल ३५० किलो

( छाया सौजन्य : अहमदाबाद मिरर )

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जबरा फॅन असलेल्या २५ वर्षीय खुशबू दावडाने त्यांना स्वत:च्या हाताने तयार केलेली कलाकृती भेट म्हणून दिली आहे. धागे विणून खुशबूने मोदींचं छायाचित्र असलेली कलाकृती तयार केली. १० किलोमीटरहून अधिक लांब असलेला धागा विणून तिने ही सुंदर कलाकृती तयार केली आहे. यासाठी खुशबूने तब्बल ८५० तास मेहनत घेतली आहे. ७ फूट लांब आणि ७ फूट रुंद असलेल्या या कलाकृतीचे वजन आहे तब्बल ३५० किलो. गुरूवारी झालेल्या कार्यक्रमात ही अनोखी भेटवस्तू तिने मोदींना एका कार्यक्रमात दिली.

वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही आवडले ट्विटरचे ‘मान्सून इमोजी’

खुशबूने धाग्यांपासून तयार केलेल्या या कलाकृतींचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केलं आहे. तिने तयार केलेल्या या कलाकृतीची नोंद याआधी लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सशक्तीकरणासाठी जे पाऊल उचललं आहे त्यामुळे प्रभावित होऊन खुशबूनेही कलाकृती तयार केली असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.

वाचा : भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण बनला अब्जाधीश

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:44 pm

Web Title: woman gifts artwork to pm narendra modi
Next Stories
1 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही आवडले ट्विटरचे ‘मान्सून इमोजी’
2 Viral : ती विकेट टिपल्यावर विराट कोहलीने दिली भन्नाट रिअॅक्शन
3 Video…आणि चक्क सिंहच मांजरीला घाबरला !
Just Now!
X