28 February 2021

News Flash

अधुरी एक कहाणी! मृत्यूच्या काही तास आधी ‘ती’ अडकली विवाहबंधनात

लग्नानंतर काही तासांनी हिथरनं जगाचा कायमचा निरोप घेतला

२२ डिसेंबरला दोघांचं लग्न झालं त्यांनंतर काही तासांनी हिथरनं जगाचा कायमचा निरोप घेतला

शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या सोबत राहण्याचं, एकमेकांना साथ देण्याचं स्वप्न हिथर मोजर आणि डेव्हिडनं काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं. पण, आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहून संसार फुलवण्याचं या दोघांचं स्वप्न अधुरंच राहिलं. कारण, लग्न झाल्यानंतर काही तासांनी हिथर डेव्हिडला सोडून कायमची निघून गेली, मात्र जाता जाता जगाला खरं प्रेम म्हणजे काय हे शिकवून गेली. वेगवेगळ्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होणाऱ्या या दोघांच्या फोटोनं प्रेमाची खरी व्याख्या काय असते हे जगाला दाखून दिलं.

अमेरिकेत राहणारे हिथर आणि डेव्हिड २०१५ मध्ये एकमेकांना भेटले. भेटीगाठीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं. हिथरला लग्नाची मागणी घालण्याआधी तिला कॅन्सर झाल्याचं डेव्हिडला समजलं, ती फार काळ जगणार नाही याची कल्पना डेव्हिडला आली. कदाचित यामुळे डेव्हिड आपल्याशी लग्न करणार नाही याची भीती हिथरला होती. मात्र, अगदी अनपेक्षितरित्या डेव्हिडनं तिला लग्नाची मागणी घातली. ३० डिसेंबरला या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. पण, त्याआधीच हिथरची प्रकृती अधिकच खालावली. तिच्याकडे फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत हे कळल्यावर रुग्णालयाच्या बेडवरच डेव्हिडनं तिच्याशी लग्न केलं.

हिथर आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. रुग्णालयात हिथर आणि डेव्हिडचे काही मोजके नातेवाईक जमले होते, या दोघांना पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. २२ डिसेंबरला दोघांचं लग्न झालं त्यानंतर काही तासांनी हिथरनं जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या एका मैत्रिणींने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 10:53 am

Web Title: woman marries the love of her life just minutes before dying
Next Stories
1 बराक ओबामांच्या आवडीची पुस्तकं आणि गाणी जाणून घ्यायची आहेत?
2 पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल
3 VIDEO : मित्रांना बार्बेक्यू ट्रिट देत शेफ सचिनने मारला मास्टर स्ट्रोक
Just Now!
X