एका महिलेने मॅक-डी अर्थात मॅकडोनाल्डमधून एक बर्गर मागवलं..पण तिच्या घरी आलं ते फक्त केचअप.. बर्गर ऑर्डर करुन केचअपच कसं काय आले याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ही घटना कॅनडामधली आहे. कॅनडातल्या एका महिलेने ऑनलाइन हॅमबर्गर ऑर्डर केलं. पण मॅक-डीने तिला फक्त केचअपचं पाकीट पाठवलं. मॅक-डीचे लोक बर्गर पाठवायला विसरले का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र हे केच-अप पाठवण्याचं कारण हास्यास्पद आहे. कॅनडातल्या महिलेनेच हे कारण समोर आणलं आहे. jodypooole या महिलेने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर बिलाचा फोटो पोस्ट केलाय. हे बिल सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे.

 

View this post on Instagram

 

we have gone viral!

A post shared by JodyPoole (@jodypooole) on

हॅमबर्गर ऑर्डर केल्यानंतर केचअपच्या आल्याने महिला हैराण झाली होती. मात्र बिल पाहिल्यावर तिला तिची चूक लक्षात आली. जॉडी पूल या महिलेने ऑर्डर करताना तिला नको असणारे पदार्थ बर्गरमध्ये घालू नये असं सांगितलं. नो रेग्युलर बन, नो मस्टर्ड, नो पिकल्स, नो रेग्युलर पॅटी, नो ओनियन असं तिने तिच्या ऑर्डरमध्ये लिहिलं होतं. तिने बर्गरसाठी लागणाऱ्या या गोष्टीच नकोत असं म्हटलं होतं. त्यामुळे मॅकडोनाल्डने तिला फक्त केचअपची पाकिटं पाठवली.