26 January 2020

News Flash

एकदम फिल्मी! पोलीस महिलेनं केलं गँगस्टरशी लग्न

जाणून घ्या लखनऊमधील चोर-पोलिसाच्या 'शुभमंगल सावधान'ची कहाणी

चित्रपटामध्ये चोर आणि पालिसाचे प्रेम फुलताना तुम्ही पाहिलंच असेल. अशीच एक कहाणी लखनऊमधील तुरूंगात घडली आहे. राहुल ठसराना असं त्या गँगस्टरचं नाव आहे. यांच्या या प्रेम कहाणीमुळे बिपाशा-डीनो मोरिया यांचा अभिनय असलेला ‘गुनाह’ चित्रपट आठवतो. सिनेमामध्ये बिपाशा बासूनं महिला पोलीसाचा तर डीनो मोरियाने गँगस्टरचे पात्र निभावलं होतं. चित्रपटामध्ये पोलीस आणि चोरांमध्ये एकमेकांवर प्रेम जुळतं. अशीच मिळतीजुळती कहाणी गँगस्टर राहुल आणि महिला कॉन्स्टेबलमध्येही दिसली. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनीही जगाची पर्वा न करता आणि सर्व कायदे-नियम विसरुन विवाहसोहळा रचला.

गँगस्टर राहुलवर डझनभर गुन्हेगारी खटल्यांची नोंद आहे. २०१४ मधील बहुचर्चित मनमोहन गोयल हत्याकांडात दोषी आढळ्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कायद्याचं रक्षण करणारे पोलीस आणि गुन्हेगार या दोघांमध्ये प्रेम फुलल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कसा फुलला प्रेमांकुर ?
जेव्हा राहुल कारागृहात कैद होता तेव्हा महिला पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत होती. यावेळी दोघांमध्ये संवाद सुरू झाला. यामधून त्यांची मनं जुळली. कारागृह परिसरात लपून छपून भेटी वाढल्या. काही काळानंतर राहुलची जामिनावर सुटका झाल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

राहुल ठसरानानं २००८ च्या दरम्यान गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं. त्याआधी तो सिकंदराबादमध्ये रिक्षा चालवायचा. त्यादरम्यान त्याची ओळख गुन्हेगारी विश्वासोबत झाली.

First Published on August 9, 2019 10:52 am

Web Title: woman police constable married history sheeter rahul thasrana in greater noida nck 90
Next Stories
1 ट्विटरचा जुना लूक हवाय? मग ‘हे’ करा
2 “…म्हणून संघ स्वयंसेवकांशी काश्मिरी मुली लग्न करत नाहीत”
3 नितीन नांदगावकरांना महिलेचा हात मुरगळणाऱ्या महापौरांना करायचाय ‘शेकहँड’
Just Now!
X