कधीही कुठेही भूक लागल्यावर झटपट करता येणारा पदार्थ म्हणजे मॅगी. याच कारणामुळे मॅगी ही अनेकांना आवडते. मॅगीला पर्सनल टच देत ती आवडेल अशा पद्धतीने बनवता येते. काहीजण देसी पद्धतीने मॅगी बनवतात तर काही जण अगदी सॅण्डवीच, डोसा यासारख्या पदार्थांमध्येही मॅगी वापरतात. मात्र मॅगी करण्याची एक भन्नाट पद्धत नेटकऱ्यांना फारशी पटलेली दिसत नाही. सामान्यपणे पाण्यामध्ये शिजवली जाणारी मॅगी ही एका महिलेने चक्क दुधात शिजवल्याने नेटकरी चांगलेच गोंधळले आहेत.

सोशल मिडियावर व्हायरल झालेली ही मॅगीची आगळीवेगळी रेसिपी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गोड मॅगी तयार कशी करावी हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. पाण्याऐवजी दूधामध्ये मॅगी शिजवून गोड मॅगी बनवता येते असं रेसेपी बनवणारी महिला सांगताना दिसते. खरं तर ही मॅगी शेवयांच्या खिरीसारखी बनवण्यात आल्याच्या या व्हिडिओमध्ये दिसते.

या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र या रेसेपीवरुन नेटकऱ्यांमध्ये दुमत असल्याचे कमेंटमधून दिसून येत आहे. काहींना ही कल्पना अगदीच विचित्र वाटली आहे तर काहींनी मात्र हा वेगळा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही असे मत नोंदवले आहे. पाहुयात नेटकरी काय म्हणतात…

भयंकर

गोड म्हणून खा

ते मॅगी मसाला पाकीट मला पाठवा

काय फालतूपणा आहे

गरुडपुराणात वेगळी शिक्षा

हीच ती खीर

एक महिना मॅगी बंद

काय पाहिलं हे

गुन्हा दाखल करा

काय पाहिलं मी हे

दरम्यान, अनेकांनी ही मॅगी नसून खीर असल्याचे म्हटले आहे. ही मॅगी चवीला कशी आहे हे प्रत्यक्षात करुन पाहिल्यावर समजू शकेल. मग तुम्ही ट्राय करणार का ही दुधवाली मॅगी?