News Flash

नोकरी मिळाल्याच्या आनंदान तरुणीनं रस्त्यावरच केला डान्स, पाहा Viral Video

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

नोकरी मिळाल्यानंतर प्रत्येकालाच खूप आनंद होतो. या आनंदाच्या क्षणी अनेकांना काय करु आणि काय नाही असं होतं. काहीजण आनंदाच्या भरात वाट्टेल ते करतात… नोकरी मिळाल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

नोकरी मिळाल्यानंतर तरुणीने चक्क ऑफिसच्या बाहेरच डान्स करत आपला आनंद साजरा केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तिची मजेशीर प्रतिक्रिया लोकांना खूप आवडत आहे. इंस्टाग्रामवर या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ऑफिसमधील कर्मचाऱ्यानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल शिवाय हसूही आवरणार नाही

@dakara_spence या युजर्सने या तरुणीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटलेय की, या तरुणीची नोकरीसाठी निवड केली. पाहा बाहेर आल्यानंतर तिची प्रतिक्रिया कशी होती.

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

So I just hired this young girl and this was her response #explore #viral #viralvideos #laugh #comedy #justjokes #explorepage #atlanta #miami #houston #california #texas #ny #nyc #chicago

रोजी @ dakara_spence ने सामायिक केलेली पोस्ट

नोकरी मिळाल्यानंतर तरुणीने व्यक्त केलेल्या आनंदाची पद्धत नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. लोक या व्हिडीओला खूप प्रतिसाद देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 2:25 pm

Web Title: woman reaction after being hired was secretly caught on camera video goes viral nck 90
Next Stories
1 अटल बोगद्याच्या उद्घाटनानंतर आनंद महिंद्रा म्हणाले, “यांना तर भारतरत्न…”
2 पाच वेळा शिफारस होऊनही महात्मा गांधींना नोबेल मिळालं नाही, कारण…
3 International Coffee Day: ‘या’ प्राण्याच्या विष्ठेतील बियांपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी
Just Now!
X