News Flash

Video : जंगलामध्ये सेल्फी काढत असतानाच मागून अस्वल आलं आणि…

अस्वलाचा हल्ला प्राणघातक ठरु शकतो

सोशल मिडियावर जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातही मगर, सरपटणारे प्राणी किंवा अत्यंत वेगवान प्राण्यांनी केलेली शिकार यासारख्या व्हिडिओला तर हजारोच्या संख्येने व्ह्यूज असतात. मात्र सध्या सोशल मिडियावर एक आगळावेगळाच व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक अस्वल चक्क एका पर्यटक महिलेच्या सेल्फीमध्ये डोकावताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द डेली मेल’ने दिलं आहे.

नक्की पाहा >> Video : फुटबॉलचा सामना सुरु असताना मैदानात दोन मोठे कांगारु आले अन्…

मिळालेल्या माहितीनुसार मॅक्सिकोमधील सॅन पॅट्रो ग्राझा ग्रॅसिक येथील लोकप्रिय चीपीनक्यू इकलॉजी पॉर्कमध्ये काही पर्यटक फिरत असतानाही ही घटना घडली. डोंगराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर घोळक्याने फिरत असलेल्या या पर्यटकांच्या गटातील एक तरुणी सेल्फी काढण्यासाठी उभी राहिली असता झाडांमधून हे अस्वल बाहेर आलं. या मुलीच्या मागे येऊन दोन पायांवर उभं राहून ते मुलीच्या खांद्यावरुन डोकवू लागलं.

सामान्यपणे अशाप्रकारे जंगली अस्वलाला पाहिल्यावर पर्यटक भितीने धावपळ करु लागतात. मात्र या तिनही मुलींनी अगदी शांतपणे या अस्वलासमोर उभ्या होत्या. जंगली अस्वलही ही मानवावर हल्ला करण्यासाठी ओळखली जातात. या अस्वलांनी केलेला हल्ला प्राणघातक ठरु शकतो. मात्र या मुलींनी घाबरुन न जाता जागेवर उभं राहण्याचं ठरवलं.

नक्की पाहा >> एकमेवाद्वितीय! भारतामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ सुंदर प्राणी; पाहून व्हाल थक्क

हे अस्वल काही काळ या मुलींच्या आजूबाजूला फिरत होतं. त्यानंतर अस्वलानेही त्यांचा वास घेतला. एका मुलीच्या मांडीवर पुढच्या पायांचा पंजा मारुन काहीतरी चाचपडल्या सारखं अस्वलाने केलं आणि ते तिथून निघून गेलं. दरम्यान या मुलींबरोबर असलेल्या इतर जोडीदारांनी अस्वलाचे लक्ष विचलित करुन मुलींना पळण्याची संधी देण्यासाठी शिट्ट्या वाजवल्या आणि वेगवेगळे आवाज काढले. मात्र सुदैवाने अस्वलाने हल्ला केला नाही आणि या मुलींना कोणताही इजा न करता तो निघून गेला.

सांगा पाहू उत्तर >> फोटोतील कोणता झेब्रा पुढे आणि कोणता मागे?; सारं जग शोधतंय उत्तर

हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून या मुलींनी दाखवलेल्या प्रसंगावधानासाठी त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2020 4:08 pm

Web Title: woman snaps selfie during close encounter with a black bear in mexico scsg 91
Next Stories
1 Video: झुडपांमध्ये जोडप्याचे सुरू होते अश्लील चाळे, संतापलेल्या आजीबाई आल्या आणि…
2 Viral Video : तहानेने व्याकूळ झाली होती खारुताई, भररस्त्यात इशारा करुन एकाकडे मागितली पाण्याची बाटली अन्…
3 Video : फुटबॉलचा सामना सुरु असताना मैदानात दोन मोठे कांगारु आले अन्…
Just Now!
X