News Flash

विश्वासघात करणा-या पतीवर पत्नीने केले चाकूने वार; व्हिडिओ व्हायरल

ही स्त्री आपल्या नव-याचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने हल्ले करताना दिसते.

आपल्या पतीने विश्वासघात केल्यावर काही स्त्रिया घरात रडत बसतात. पण काही स्त्रिया अशा गोष्टींचा विरोध करतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.
आपल्या पतीवर एक स्त्री चाकूने वार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक स्त्री आपल्या पतीवर चाकूने हल्ला करताना दिसते. आपल्या पत्नीपासून बचाव करण्यासाठी सदर पुरुष जीवाच्या आकांताने यात पळताना दिसत आहे. तसेत हा पुरूष रक्ताने माखलेलाही दिसतो. त्यात रागात असलेली ही स्त्री आपल्या नव-याचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने हल्ले करताना दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुरुषाने आपल्या पत्नीचा विश्वासघात केला. जेव्हा सदर स्त्री आपल्या पतीवर चाकूने हल्ले करत होती तेव्हा आजूबाजूचे लोक जमा होऊन हा सर्व प्रकार बघत होते. पण त्या दोघांमध्ये पडून तिला थांबवण्याची हिंमत कोणालाच झाली नाही. व्हिडिओत महिला सतत ओरडताना दिसते.
हा व्हिडिओ चीनमध्ये शूट केल्याचे म्हटले जातेय. या व्हिडिओला लाइव्हलीकने सर्वात पहिले लीक केले होते. तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडिओला एक लाखांपेक्षाही अधिक शेअर केले गेलेय. तसेच, ज्या पुरुषावर हा हल्ला झाला तो आणि त्याच्यावर चाकूने वार करणारी त्याची बायको यांच्यासंबंधी कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 10:59 am

Web Title: woman stab husband in shocking video
Next Stories
1 …या देशांच्या आहेत चक्क दोन राजधानी
2 हे आहेत जगातले सगळ्यात जास्त कलात्मक देश
3 गुगलचे नवे व्हिडिओ कॉलिंग ‘ड्युओ अॅप’
Just Now!
X