19 September 2020

News Flash

ऐकावं ते नवलं! दगड चोरणाऱ्या महिलेच्या मागावर पोलीस

मुळात महिलेनं संग्रहालयात इतर दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू असताना दगडच का चोरला? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातून एका दगडासाठी पोलीस या महिलेच्या मागावर का आहेत

या महिलेनं चोरलेल्या दगडाची किंमत तब्बल अडीच लाख रुपये असल्याचं समजत आहे.

तुम्ही आतापर्यंत चोरीचे एकापेक्षा एका भन्नाट किस्से ऐकले असतील. पण टोरँटोमधल्या या चोरीचा किस्सा नक्कीच ऐकला नसाल. एका महिलेनं येथील गार्डीनर संग्रहालयातील दगड चोरला म्हणून तिच्या मागावर पोलीस आहेत. पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या महिला चोराचा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे चोरीचं हे प्रकरण ऐकून अनेकांना हसू अनावर झालं होतं.

उशिरा येण्याच्या कारणावरून बॉसने झापलंय? मग ही बातमी दाखवा..

मुळात महिलेनं संग्रहालयात इतर दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू असताना दगडच का चोरला? असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातून एका दगडासाठी पोलीस या महिलेच्या मागावर का आहेत हे जाणून घेण्याच कुतूहल अनेकांना आहे. त्यामुळे चोरीचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच रंगाला होता. आता एका दगडासाठी पोलीस तिच्या मागावर का गेले आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर या महिलेनं चोरलेल्या दगडाची किंमत तब्बल अडीच लाख रुपये असल्याचं समजत आहे. या दगडावर love yourself असं लिहिलंय.

Viral Video : अरेच्चा! इतकी वर्षं आपण चुकीच्या पद्धतीने सुईत धागा ओवतोय?

नदीच्या पात्रातील हा दगड गेल्या काही महिन्यांपासून येथे प्रदर्शनास आहे. दिसायला जरी हा साधासुधा दगड असला तरी त्याची किंमत लाखोंच्या घरात असल्यानं महिलेला तो चोरण्याची इच्छा झाली नसेल तर नवल वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 4:00 pm

Web Title: woman steals rock worth rs 2 lakh
Next Stories
1 उशिरा येण्याच्या कारणावरून बॉसने झापलंय? मग ही बातमी दाखवा..
2 Viral Video : अरेच्चा! इतकी वर्षं आपण चुकीच्या पद्धतीने सुईत धागा ओवतोय?
3 इंडिगो विमानात डासांचं साम्राज्य! तक्रार करणा-या डॉक्टरला धक्के मारुन विमानातून उतरवलं
Just Now!
X