News Flash

viral video : महिलेने क्षुल्लक कारणासाठी गर्भवती महिलेची वाट रोखून धरली

पैसा झाला मोठा माणुसकी झाली छोटी

गाझियाबाद मोदीनगर मधल्या राष्ट्रीय महामार्ग ८ वर हा प्रकार घडला. ( छाया सौज्यन : Viral Tube/Youtube)

एक बाईच बाईचे दु:ख समजू शकते असे म्हणतात, मग एक बाई निष्ठुर कशी काय होऊ शकते? जगात माणूसकी मेली अन् येथे माणूसकीपेक्षा पैश्याचा माज लोकांना चढला की काय आता असंच म्हणावं लागेल. आपल्या महागड्या ऑडीला एका कारने धक्का दिला त्यामुळे रागावेल्या महिलेने गर्भवती महिलेची वाट रोखून धरली. या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या. वेदनेने ही महिला कळवळत होती तरी या महिलेलातिची दया आली नाही आणि तिच्या नव-याला गाडीची चावी देण्यास साफ नकार दिला.

जगात माणुसकीपेक्षा आता पैसा मोठा झाला आहे असेच हा व्हिडिओ बघून कोणालाही वाटेल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गाझियाबाद मोदीनगर मधल्या राष्ट्रीय महामार्ग ८ वर हा प्रकार घडला. आपल्या बायकोला प्रसुती कळा सुरु झाल्या म्हणून नवरा तिला घेऊन आपल्या गाडीने रुग्णालयात जात होता. पण या गाडीचा धक्का ऑडीला लागला आणि ऑडीवर ओरखडे पडले. त्यामुळे राग अनावर झालेल्या महिला चालकाने भर रस्त्यात गोंधळ घातला. तिने गाडीची चावी काढून घेतली. चावी देण्यासाठी आणि हे प्रकरण इथेच मिटवण्यासाठी हा पती सारख्या विनवण्या करत होता. गाडीत त्याची पत्नी वेदनेने विव्हळत होती पण तरीही या बाईला दया आली नाही. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 5:17 pm

Web Title: woman stops man from taking pregnant wife to hospital
Next Stories
1 इथे १५ मिनिटात भाग्य बदलून मिळेल!
2 Viral video : मोटारमनच्या प्रसंगावधानाने चर्नी रोड स्टेशनवरचा अपघात टळला
3 VIDEO : आपल्या पिल्लासाठी शेवटपर्यंत शिका-यांशी लढली मादा डॉल्फिन
Just Now!
X