12 July 2020

News Flash

नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावरून आणलेल्या ‘त्या’ ठेवीवर महिलेनं केला दावा

अपोलो मोहीमेनंतर खुद्द अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग यांनी आपल्याला चंद्रावरची धूळ भरून ठेवलेली एक छोटी कुपी दिली होती असा दावा तिनं केला होता.

लॉरा सिको या सिनसिनाटीमध्ये राहणाऱ्या महिलनेनं या कुपीवर आपला हक्क सांगातिला आहे.

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या निल आर्मस्ट्राँगकडून भेट म्हणून दिलेल्या कुपीवर नासानं हक्क सांगू नये यासाठी एका महिलेनं चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. अपोलो मोहीमेनंतर खुद्द अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग यांनी आपल्याला चंद्रावरची धूळ भरून ठेवलेली एक छोटी कुपी दिली होती असा दावा तिनं केला होता. ही कुपी भविष्यात नासानं आपल्याकडून घेऊ नये किंवा स्वत:चा मालकी हक्क त्यावर सांगू नये यासाठी तिनं न्यायालयात धाव घेतली आहे.

लॉरा सिको या सिनसिनाटीमध्ये राहणाऱ्या महिलनेनं या कुपीवर आपला हक्क सांगातिला आहे. ही कुपी ती दहा वर्षांची असताना निल आर्मस्ट्राँगकडून भेट म्हणून मिळाली असल्याचं तिनं सांगितलं आहे. ” माझे वडील आणि निल आर्मस्ट्राँग यांचे खूप घनिष्ठ संबंध होते. मी दहा वर्षांची असताना त्यांनी मला एक भेट दिली होती. जी माझ्या आई-वडिलांकडेच होती आणि मी ती कधीही उघडून पाहिली नाही. पालकांच्या निधनानंतर ती भेटवस्तू मी उघडून पाहिली आणि मला धक्काच बसला कारण त्यात चंद्रावरची धुळ आणि आर्मस्ट्राँग यांचा संदेशही होता अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे.

या कुपीसोबत जोडलेल्या पत्रात “लैरा एन मुरे – बेस्ट ऑफ लक – नील आर्मस्ट्राँग अपोलो 11” असा संदेश लिहिला होता तसेच यावर आर्मस्ट्राँग यांची स्वाक्षरी असल्यानं तिच्या एका दाव्यात तत्थ होतं. या कुपीवर अद्यापही नासानं आपला हक्क सांगितलेला नाही. पण, चंद्रावरून आणलेली ही वस्तू कोणत्याही संशोधन संस्थेसाठी बहुमूल्य अशीच आहे. याआधी अशा मौल्यवान वस्तू नासानं काही नागरिकांकडून काढून घेतल्या आहेत त्यामुळे मला दिलेली ही मौल्यवान भेटही नासानं घेऊ नये म्हणून मी न्यायालयात धाव घेतली आहे असं ती म्हणाली आहे.

ही कुपी निल आर्मस्ट्राँगनं दिली या दाव्यता जरी तथ्य असलं तरी या कुपीत चंद्रावरची धूळ आहे की नाही यावर मात्र संशोधकांचं दुमत आहे. काहींच्या मते ही चंद्रावरची धुळ नसून त्यात पृथ्वीवरची मातीही मिसळली होती असं अनेकांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2018 4:12 pm

Web Title: woman sues nasa over vial of moon dust which is given by neil armstrong
Next Stories
1 उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला अवाढव्य व्हेल मासा
2 आठवडाभरानंतर पक्ष्याच्या चोचीतून काढली प्लास्टिकची रिंग, सुदैवानं वाचला जीव
3 ‘या’ सेकंड हँड बॅगची किंमत ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल
Just Now!
X