News Flash

विचित्र! विमानात वारंवार कपडे काढत होती महिला, अखेर कर्मचाऱ्यांनी दोरीने बांधले हात-पाय

कपडे न काढण्याची वारंवार विनंती करुनही काहीही ऐकायला तयार नव्हती महिला...

( फोटो सौजन्य : Reuters )

रशियाच्या एका विमानात विचित्र घटना घडली आहे. विमानातील एक प्रवासी महिला वारंवार तिचे कपडे काढण्याचे प्रयत्न करत होती. अखेर विमानातील कर्मचाऱ्यांना दोरीच्या सहाय्याने त्या महिलेला खुर्चीला बांधून ठेवावं लागलं.

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरातून एका विमानाने उड्डाण घेतलं. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर साधारण १५ मिनिटांमध्येच एक ३९ वर्षीय महिला प्रवासी विचित्र वागायला लागली. ही महिला विमानातील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचंही पालन करत नव्हती. कपडे न काढण्याची वारंवार विनंती करुनही ही महिला काही ऐकायला तयार नव्हती.

अखेर विमानातील कर्मचाऱ्यांनी काही प्रवाशांच्या मदतीने महिलेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिलेला दोरी व टेमच्या सहाय्याने विमानातील खुर्चीला बांधून ठेवलं. विमान लँड होईपर्यंत, म्हणजे पूर्ण प्रवासात या महिलेला दोरीने बांधूनच ठेवण्यात आलं होतं. पुन्हा कपडे काढू नयेत व अन्य प्रवाशांसाठी कोणता धोका निर्माण होऊ नये यासाठी तिला बांधून ठेवण्यात आलं होतं. नंतर विमान Novosibirsk’s Tolmachevo विमानतळावर लँड झाल्यानंतर महिलेला उतरवण्यात आलं व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. नंतर महिलेने विमानात चढण्यापूर्वी आपण सिंथेटिक ड्रग घेतले होते, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली अशी कबुली दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 11:14 am

Web Title: woman tied to seat in russian flight after she repeatedly tried to take underwear off in mid air sas 89
Next Stories
1 मैत्रिणीने लव्ह प्रपोजल स्वीकारण्यासाठी मदत मागणाऱ्या तरुणाला पुणे पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…
2 अभिमानास्पद! बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करते ड्युटी
3 धक्कादायक! पाठवणीवेळी अति रडल्यामुळे नववधूला आला ‘हार्टअटॅक’, झाला मृत्यू
Just Now!
X