03 August 2020

News Flash

गाण्यानंतर आता डान्समुळे रानू मंडल चर्चेत; पाहा व्हायरल व्हिडिओ

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल आठ सेकंदांच्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत

रानू मंडल

पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्टेशनवर गातानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आहेत. एका व्हायरल व्हिडिओमुळे हिंदी सिनेमांमध्ये पार्श्वगायिका म्हणून संधी मिळालेल्या रानू यांच्या नावाने सोशल मिडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रानू या गाण्याऐवजी नाचताना दिसत आहे. खरं तर व्हायरल व्हिडिओमधील महिला ही रानू मंडल नसून त्यांच्यासारखी दिसणारी महिला आहे. मात्र हेच साधर्म्य असल्याने अनेकजण हा व्हिडिओ रानू मंडल यांचा डान्स अशा माहिती सहीत शेअर करत आहेत.

सोशल मिडियावरुन लोकांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळण्याची अनेक उदाहरणे आहेत. याच ट्रेण्डमधील भारतातील सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे रानू मंडल. त्यांचा गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील गायक हिमेश रेशमिया याने त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवून त्यांच्याकडून आगामी ‘हॅपी हार्डी अॅण्ड हीर’ या सिनेमासाठी गाणे गाऊन घेतले. या रेकॉर्डिंगचा व्हिडिओ त्याने पोस्ट केल्यानंतर अनेकांनी रानूबरोबरच त्याचेही कौतुक केले. त्यानंतर रानू यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना अनेकांकडून आता गाण्यासाठी ऑफर येत आहेत. असं असतानाच आता त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या एक माहिलेचा नवरात्रीमधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांना व्हिडिओमधील महिला ही रानूच असल्याचे वाटत आहे. मात्र व्हिडिओत दिसणाऱ्या रानू मंडल नाहीत हे नीट पाहिल्यास समजते. व्हायरल व्हिडिओमधील ही महिला कोण आहे याबद्दलची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण हा आठ सेकंदांचा व्हिडिओ रानू यांच्या नावानेच शेअर केला जात आहे.

दरम्यान, रानू नुकत्याच ‘हॅपी हार्डी अॅण्ड हीर’ सिनेमाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात दिसून आल्या होत्या. त्यावेळी हिमेशला त्यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 9:58 am

Web Title: women dance on road many says its ranu mandal scsg 91
Next Stories
1 Viral Video : चक्क माकड शोधत पोलिसांच्या डोक्यातील उवा
2 Viral Video : माकडाला कळले, तुम्हाला कधी कळणार
3 ‘लिंबू मिरची न लावल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे चाक मातीत रुतले’; फडणवीसांची उडवली खिल्ली
Just Now!
X