रशियामध्ये, दोन महिला ६३०० फूट उंच कड्यावर पाळण्यात झोका घेत होत्या. तेव्हा अचानक पाळणा तुटला आणि दोन्ही महिला उंच कड्यावरून खाली पडल्या. यादरम्यान त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, महिला रशियन प्रजासत्ताकच्या दागिस्तानमध्ये सुलाक कॅन्यनवर पाळण्यावर बसल्या होत्या.  दरम्यान, एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. पाळण्याची साखळी अचानक तुटून पडली. त्यावेळी महिला काठावरुन खाली पडल्या, यामध्ये महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुदैवाने, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

हेही वाचा- Video : पूर आलेल्या नदीमधून नेली एसटी बस; कोकणमधील महाड येथील धक्कादायक प्रकार

इतक्या उंचीवरून खाली पडूनही, दोन्ही महिलांना किरकोळ जखमा झाल्या आणि त्या पूर्णपणे बऱ्या आहेत. मात्र या घटनेमुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. साखळी तुटल्याने महिला पडल्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांना देखील धक्का बसला आहे. पहा व्हिडिओ…

सुरक्षा यंत्रणेत एवढी मोठी चूक कशी झाली, याविषयी पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. तसेच भविष्यात अशी कोणतीही घटना होऊ नये  म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था आणि इतर सेवा संस्था याचा आधीपासून तपास करत आहेत.