शार्क म्हटलं की सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा भितीचं वातावरण निर्माण होतं. शार्कला पाहून जवळपास सर्वजण घाबरतात. पण एका तरुणीनं शार्कच्या शेपटीला धरुन ओढत नेहत त्याला जीवदान दिलं आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शार्कच्या शेपटीला पकडण्याची हिम्मत शक्यतो कुणी करणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायल होत आहे. यामध्ये ती तरुणी शार्कच्या शेपटीला पकडून समुद्रात घेऊन जात मदत करते. पाण्याच्या लाटेबरोबर शार्कला समुद्रात जाण्यासाठी तरुणीनं शार्कची मदत केली. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला असून अनेकींनी त्या तरुणीला मर्दानी, शेरणी आणि खरा हिरो यासारखी नावं दिली आहेत.

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरला पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी भन्नाट असं कॅप्शनही लिहलेय. ते म्हणतात की, ‘सर्व शार्क खतरनाक नसतात. एका मुलीने शार्कला वाचवण्यासाठी असे काहीतरी केले. महासागरांमध्ये असणाऱ्या शार्कच्या एकूण ५०० प्रजातींपैकी फक्त ३० प्रजाती माणसावर हल्ला करतात.’


२० सेकंदाच्या या व्हिडीओला सोशल मीडिायवर चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलं आहे. व्हिडीओतील मुलीचं कौतुकच खूप जणांनी कमेंटमध्ये केलं आहे.