महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. त्यामुळे जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. या दिवशी मुख्यत्वेकरुन महिलांना एखादी भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र अनेक वेळा महिलांना कोणती भेटवस्तू द्यावी याविषयी पुरुषांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातल्या स्त्रियांना एखादं गिफ्ट द्यायचं असेल तर या पर्यायांचा नक्कीच विचार करायला हवा.

१. कॅरेटलेन बटरफ्लाय इअररिंग्स –
महिलांना दागदागिन्यांची विशेष हौस असते. त्यामुळे त्यांना एखादा छानसा दागिना दिला तर त्यांचा आनंद नक्कीच वाढेल. यासाठीच कॅरेटलेन बटरफ्लाय इअररिंग्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. ओमनी-चॅनल ज्वेलर कॅरेटलेनने हे कानातले तयार केले आहेत. स्वप्नांचा पाठलाग करणे, या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे अशा अनेक गोष्टीचा सामना आजची स्त्री करताना दिसते. याच प्रेरणेवर आधारित कॅरेटलेन बटरफ्लाय कलेक्शनची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यत्वे बटरफ्लाय सोन्यामध्ये बनवून त्यामध्ये निळा, केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा दिल्या जातात. याची किंमत ही परवडणारी आहे, तसेच वजनाने हलके व नेहमी वापरण्याजोगे असल्याने आपल्या आई, बहिण, मैत्रिणीला किंवा ऑफिस कलिगला प्रेरणादायी कॅरेटलेन बटरफ्लायचे कलेक्शन देऊन तिचा योग्य सन्मान करू शकता.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

२. कॅरेटलेन गोल्ड लेस –
गोल्ड लेस हा पत्नी किंवा प्रियसीला गिफ्ट देण्यासाठी उत्तम दागिना आहे. या दागिन्यामध्ये खासकरुन सोन्यासह मोत्यांचाही वापर केला जातो. वर्तुळाकार काड्यांना कलात्मक पद्धतीने लेसचा आकार दिला जातो. त्यामुळे याला गोल्ड लेस असं म्हटलं जातं. ऑफिस, पार्टी यासारख्या ठिकाणी हे सहज घालून जाता येऊ शकतं.

३. कॅरेटलेन आरण्य पेंडंट –
निसर्गावर आधारित या पेण्डंटची थीम आहे. त्यामुळे जर तुमची मैत्रीण, आई किंवा बहीण यांचं निर्सगावर प्रेम असले, त्यांना निसर्गाप्रतीची ओढ असेल तर हे गिफ्ट बेस्ट ऑप्शन ठरु शकतं. झाडांची कोरलेल्या पानांवर आधारित याची रचना असून याच्या मध्यभागी हिऱ्यांचे कोंदण दिल आहे, त्यामुळे ते लक्ष वेधून घेते. यावर केलेली कलाकुसर कोणत्याही महिलेच्या पसंतीस उतरते. विशेष करुन हे गिफ्ट पत्नीसाठी योग्य असल्याचं अनेकांच मत आहे.

४. लिवा प्लेड अॅण्ड चेक्स-
अनेक स्त्रियांना कपड्यांची मोठी हौस असते. बदलत्या ट्रेण्डनुसार आपल्या राहणीमानात, गेटअपमध्ये बदल करण्यासाठी महिला अनेक वेळा कपड्यांची शॉपिंग करताना दिसतात. त्यामुळे या महिला दिवसाचं निमित्त साधून आपल्या मैत्रिणीला लिवा प्लेड अॅण्ड चेक्स नक्कीच गिफ्ट करा. या ड्रेसमध्ये स्कॉटिश प्लेड्सपासून ते गिंगहॅम, फ्लॅनेल मद्रास चेक्स सारखे प्रिंटपर्यंत वेगवेगळे पॅटर्न उपलब्ध आहेत.  हे प्रिंट्स आधीपासून लोकप्रिय असून ते कुठल्या ही सीजनमध्ये वापरू शकतो. पारंपरिक जुन्या पद्धतीचे बफेलो चेक्स किंवा सेल्टिक टार्टनपासून आजच्या चेक्सच्या प्रिंटमध्ये मिळतात. कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा इतर वेळीही काम करणाऱ्या महिलांसाठी लिवा प्लेड अँड चेक्स उत्तम गिफ्ट ठरू शकेल.

५. लिवा क्रीम पॉली जॅकर्ड टॉप / लिवा क्रीम सॅटिन प्लेटेड ट्राऊजर –
व्हिस्कोसपासून बनवलेल्या कपड्यांचे हे सॉफ्ट टेक्सचर आहे. ज्यामुळे त्यांना सहजपणे ड्रेप करणे सोपे होते आणि आपल्याला पाहिजे असलेल्या स्टाईल मध्ये वापरण्यास सोपे होते. फॅब्रिकची फ्लुएडीटी शरीरावर ड्रेप करण्यास अधिक मदत करते, त्यामुळे फॅब्रिक अंगावर चमकण्यास मदत होते. कपड्यांसह लेयरिंग अत्यंत सोपे आहे, कारण याचा पोत कपड्याचा गोळा होऊ देत नाही. क्रीम, उज्ज्वल रंग आणि पेस्टल्स रंग ट्रेन्डमध्ये आहेत, त्यामुळे फॅब्रिकची रंगीत होणारी क्षमता अधिक आकर्षक बनवते. लाकडाच्या लगद्यापासून बनवलेल्या कपड्यांना एक वेगळेच तेज असते, जे शरीरावरच्या कपड्याना सुद्धा येते. लिवा चे हे सस्टेनेबल कपडे विशेषतः कोणत्याही पार्टी साठी सर्वोत्तम आहेत.