आपल्या वेगवान आयुष्यातून थोडीशी विश्रांती घेऊन आराम करण्याची, ताजेतवाने होण्याची आणि कुटुंब-मित्रमंडळींसोबत छान वेळ घालवण्याची गरज पूर्ण करण्याची संधी म्हणजे सुट्टी. परंतु कुटुंबियांसोबत निवांत क्षण व्यतीत करण्याची जागा कोणती हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. त्यातच जर कुटुंब मोठं असेल तर स्वस्तात मस्त ठिकाण शोधण्याकडे साऱ्यांचा कल असतो.

पॅरिस, सिंगापूर आणि हॉंगकॉंग ही शहरे फिरण्यासाठी जगभरातील सर्वात महागडी शहरे आहेत. तर भारतातील दिल्ली, चेन्नई आणि बंगलुरू ही सर्वात स्वस्त शहरे आहेत. इकोनॉमिक इंटेलिजेन्ट यूनिट २०१९ च्या कॉस्ट ऑफ लिविंग सर्वेच्या अभ्यासानंतर हे सिद्ध झाले आहे. या सर्वेमध्ये १३३ शहरांतील १५० वस्तूंचा अभ्यास करण्यात आला होता. त्या अभ्यासानंतर पॅरिस, सिंगापूर आणि हॉंगकॉंग ही शहरे जगातील सर्वात महागडी असल्याचे तर भारतातील दिल्ली, चेन्नई आणि बंगलुरू ही सर्वात स्वस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वीझरलँडमधील ज्यूरिक हे शहर चौथ्या क्रमांकावर आहे. तर जपानमधील ओसाका हे पाचव्या स्थानकावर आहे. सियोल, कोपेनहेगन, संयूक्त न्यूयार्क ही शहरेदेखील रांगेत आहेत.

तसेच देशातील सर्वात स्वस्त ठिकाणांमध्ये दिल्ली, चेन्नई आणि बंगलुरूनंतर कराकस, दमिश्क, ताशकंद, अलमाटी, कराची, लागोस, ब्यूनस आयर्स या शहरांचा समावेश होता.