भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक तरूणीच्या हातात स्पेनचा झेंडा पाहून सोशल मीडयावर आश्चर्य व्यक्त केले जात होते. स्पेन म्हटले की डोळ्यांसमोर फूटबॉल येते. मात्र, क्रिकेट मैदानावर तरूणी झेंडा घेऊन काय करत होती? असा प्रश्न त्यावेळी अनेक क्रीडा चाहत्यांना पडला होता. पण तो क्षण धोनीसाठी खरच खास होता. आता म्हणाल येथे धोनी कुठे मध्येच आला. हो ना. पण ती चाहती धोनीची फॅन होती. फक्त धोनीला भेटण्यासाठी आपल्या कुटुंबियांसोबत ती इंग्लंडला पोहचली होती.

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार धोनीचे चाहते जगभर आहेत. धोनीला भेटण्यासाठी एक चाहती तब्बल 3860 किमीचा प्रवस करून इंग्लंडला पोहचली. शर्लू रायसिंघानी असे त्या तरूणीचे नाव आहे. शर्लूचा पती राजेश सांगतो, माझी पत्नी आणि मुलगा धोनीचे मोठे चाहते आहेत. धोनीची मुलगी जीवा साठी आम्ही खास भेटवस्तूही आणली होती. धोनीला भेटण्यासाठी आम्ही ऑक्टोबरमध्येच तिकीट खरेदी केले होते. तेव्हापासून धोनीला भेटण्याची तयारी सुरू कोली होती.

शर्लू म्हणाली की, धोनीला पाहण्यासाठी आम्ही तब्बल ३८६० किमीचा प्रवास केला. धोनीला खेळताना पाहून मला विश्वास बसत नव्हता. आयुष्यात आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा किंवा पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.

दरम्यान, भारताने बांग्लादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी भारताचा साखळी फेरीतील अखेरचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.