News Flash

‘न्यूझीलंडच खरा विजेता’, आयसीसीच्या नियमांविरोधात संतापाची लाट

'तुमच्या हातात विश्वचषक नसला तरी तुम्हीच खरे विजेते, आयसीसीच्या चुकीच्या...

इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास घडवला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला . लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत विलक्षण उत्कंठावर्धक ठरला. शेवटच्या षटकात सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक निर्णायक प्रसंग आले.

सुपर ओव्हरच्या आधी झालेल्या अखेरच्या षटकात 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना स्टोक्सने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याला धावबाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूने चेंडू फेकला. त्यावेळी धावबाद होऊ नये यासाठी स्टोक्सने स्वतःला खेळपट्टीवर झोकून दिलं. त्याचवेळी चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागला आणि चेंडूची दिशा बदलली व चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. यानंतर धावून काढलेल्या 2 धावा आणि अतिरिक्त चार धावा अशाप्रकारे 6 धावा स्टोक्सला ऐनवेळी मिळाल्या आणि याच प्रसंगानंतर सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला.  यानंतर सामना टाय झाला. सामना टाय झाल्याने वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली.

इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या. विशेष म्हणजे प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या आणि सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत आयसीसीच्या नियमांनुसार अखेर इंग्लंडला सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर मात्र नेटकऱ्यांकडून तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंकडून आयसीसीच्या नियमाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी अखेरपर्यंत झुंजणारा न्यूझीलंड संघच आमच्यसाठी खरा विजेता असल्याचं मत व्यक्त केलं. तुमच्या हातात विश्वचषक नसला तरी तुम्हीच खरे विजेते आहात आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांचा फटका तुम्हाला बसलाय अशाप्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतिरिक्त 4 धावा देण्याचा नियम अतिशय चुकीचा असून त्याचाच फटका न्यूझीलंडच्या संघाला बसला असं अनेकांनी म्हटलंय. तसंच सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेता शोधण्याच्या नियमावरही अनेकांनी आक्षेप घेतला आणि अजून एक सुपर ओव्हर का खेळवू नये असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, विरोधात अनेक निर्णय जाऊन देखील त्याचा विरोध न करता पराभव स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाचं आणि कर्णधार केन विल्यम्सनचं कौतुक होत आहे. तर, आयसीसीने नियमांमध्ये बदल करावेत अशी मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यातल्या खेळीसाठी स्टोक्सला सामनावीराचा किताब घोषित करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 10:08 am

Web Title: world cup 2019 final new zealnad wins heart they are real winners says fans slams icc rules sas 89
Next Stories
1 गप्टील धावबाद झाल्याने किवींचं स्पप्नभंग, भारतीयांनी करुन दिली धोनीची आठवण
2 Video : आईची माया! चिमुकल्या पक्षिणीच्या प्रयत्नांपुढे ट्रॅक्टरचालकानेही टेकले हात
3 धोनी धावबाद झाला तेव्हा न्यूझीलंडचे सहा खेळाडू सर्कलच्या बाहेर होते? जाणून घ्या सत्य
Just Now!
X