News Flash

कोहली की बाबर, कोणाचा ‘कव्हर ड्राइव्ह’ सर्वोत्कृष्ट ? आयसीसीने शेअर केला व्हिडिओ

आयसीसीने भारत-पाक चाहत्यांमधल्या वादाच्या विषयाला नव्याने फोडणी दिलीये

(व्हिडिओचा स्क्रीनशॉट )

मी विराट कोहलीच्या जवळही नाही, विराटसारखं व्हायला मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे असं स्पष्टीकरण वारंवार देऊन देखील पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम याची तुलना भारताचा कर्णधार विराट कोहलीशी सतत होत असते. कोहलीसोबतची तुलना थांबवण्यात यावी, अशी बाबरने स्वतः विनंती करुन देखील पाकिस्तानी माध्यमं नेहमी त्याची तुलना कोहलीशी करत असतात. कोहली आणि बाबर या दोघांवरुन दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियात अनेकदा वाद होताना दिसतात. भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांमधल्या याच वादाच्या विषयाला आयसीसीने ट्विट करुन नव्याने फोडणी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बाबर आझम आणि विराट कोहली या दोघांनी मारलेला अप्रतिम कव्हर ड्राइव्हचा व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे. आयसीसीने ट्विटमध्ये दोघांची थेट तुलना केलेली नाही. मात्र, एकाच व्हिडिओमध्ये कोहली आणि बाबरने मारलेला कव्हर ड्राइव्ह दाखवल्याने त्या व्हिडिओखाली आपोआपच भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये ‘कमेंट-वार’ सुरू झालं आहे.

पाहा व्हिडिओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:08 pm

Web Title: world cup 2019 virat kohli and babar azam cover drive comparison icc tweet sas 89
Next Stories
1 #MumbaiRains: खऱ्याखुऱ्या पावसानंतर पडला ‘मिम्सचा पाऊस’, पाहा व्हायरल मिम्स
2 याला म्हणतात परवडणारी गाडी, एका चार्जिंगमध्ये ७२५ किमी धावणार
3 ‘नोटाबंदीनंतर फसलेला सर्वात मोठा प्रयोग म्हणजे विजय शंकर’, चाहते संतापले
Just Now!
X