नाताळाचा सण जवळ येत आहे. या सणात सर्वाधिक महत्त्व असतं ते ख्रिस्मस ट्रीला. अनेक कुटुंबीय नाताळाच्या आधी ख्रिस्मस ट्रीची खरेदी करतात. त्याला विविध प्रकारच्या सजावटीनं सजवतात. तर पुढील आठवड्यात येऊन ठेपलेल्या नाताळाच्या सणासाठी जर्मनीमधल्या एका सोने व्यापारी कंपनीनं चक्क सोन्याच्या नाण्यापासून ख्रिस्मस ट्री तयार केला आहे.

या ट्रीसाठी दोन हजारांहून अधिक नाणी वापरण्यात आली होती. या ट्रीची किंमत १८ कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. ऑरम कंपनीतील कर्मचाऱ्यांनी काही तास खर्च करून सोन्याच्या नाण्यांनी ख्रिस्मस ट्री सजवला आहे. जवळपास १० फूट उंच असणाऱ्या ख्रिस्मस ट्रीसाठी ६३ किलो सोनं वापरण्यात आलं आहे.

या ख्रिस्मस ट्रीसाठी १८ कोटी रुपयांची सोन्याची नाणी वापरण्यात आल्याचं समजत आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा ख्रिस्मस ट्री असल्याचं म्हटलं जात आहे.