आज १४ सप्टेंबर आहे, आजचा दिवस ‘जागतिक हिंदी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरात हिंदी भाषेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आजचा दिवस साजरा केला जातो. आज हिंदी भाषेतील कविता, शायरी, कथा कथन, काव्य संमेलन अशा विविध उपक्रमांद्वारे हिंदी साहित्यातील कर्तृत्ववान मंडळींना मानवंदना दिली जाते. सोशल मीडियावरही आजचा दिवस साजरा केला जात आहे. काही नेटकऱ्यांनी तर चक्क हॉलिवूड चित्रपटांची मजेशीर हिंदी नावे अपलोड करण्यास सुरुवात केली आहे.

चला तर मग पाहूया ट्रोल होणारे काही मजेशीर मीम्स….

१० जानेवारी १९७५ साली तत्कालीन पंचप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थित पहिल्या विश्व हिंदी सम्मेलनलाचे उद्घाटन केले गेले होते. २००६ पासून आजचा दिवस ‘जागतिक हिंदी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला.