News Flash

World Press Photo of the Year : धगधगत्या सूडाची काळीज पिळवटून काढणारी कहाणी

'काही वेळानंतर माझं चित्त थाऱ्यावर आलं कारण माझ्यासमोर आगीचा लोट नसून एका जिवंत माणसानं पेट घेतला होता. माझ्यासमोरून तो धावत गेला. '

३ मे २०१७ मध्ये छायाचित्रकार रोनाल्डो शेमित्झ यानं हा फोटो टिपला होता.

‘तरुण जोरदार घोषणाबाजी करत होते. आजूबाजूला जाळपोळ सुरू होती. बंडखोरांना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्यांना आवरणं कठीण जात होतं. माझ्या देशात काय सुरू होतं मलाच कळत नव्हतं. अचानक मोठा स्फोट झाला. मला धगधगत्या आगीची झळ जाणवली. हळूहळू मला अधिक तीव्रतेनं झळा बसू लागल्या. मी कॅमेरा काढला आणि माझ्या कॅमेरात फोटो टिपण्याचा प्रयत्न करू लागलो. मला माहीत नाही मी किती फोटो काढले असतील पण आगीचा लोट जोपर्यंत माझ्यासमोर होता तोपर्यंत मी फोटो काढत गेलो. काही वेळानंतर माझं चित्त थाऱ्यावर आलं कारण माझ्यासमोर आगीचा लोट नसून एका जिवंत माणसानं पेट घेतला होता. माझ्यासमोरून तो धावत गेला. अखेर काही आंदोलकांनी पुढे येऊन त्याची आग विझवली.’ छायाचित्रकार रोनाल्डो शेमित्झ यानं या फोटोमागचा प्रसंग सांगितला.

या फोटोसाठी World Press Photo of the Year चा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. गेल्यावर्षी व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्षांविरोधात सामान्य जनतेनं सुरू केललं आंदोलन टिपण्याची जबाबदारी रोनाल्डोवर होती. ३ मे २०१७ मध्ये त्यानं हा फोटो टिपला होता. सुरक्षारक्षकाची मोटारसायकल काही आंदोलकांनी ताब्यात घेतली. तिच्यातून वायूगळती सुरू झाली आणि काही सेकंदात तिथे मोठा स्फोट झाला. २८ वर्षांच्या विक्टर सालाझार तिथेच होता. आगीत तो होरपळला, स्वत:ला वाचवण्यासाठी पळत असताना रोनाल्डो शेमित्झ यांनी हा फोटो टिपला. अखेर काही आंदोलकांनी पुढे येऊ आग विझवली. या आगीत तो ७० टक्के भाजला. त्याच्यावर उपचार सुरू होते पण यावेळी त्यानं मरण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही रोनाल्डोनं सांगितलं. यात जवळपास १२५ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती रोनाल्डोनं दिली.

या फोटोला एवढा मोठा पुरस्कार मिळेल याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. पण जेव्हा केव्हा हा फोटो मी पाहतो तेव्हा माझ्या देशातल्या भीषण परिस्थितीची जाणीव मला होते आणि माझं काळीज पिळवटून निघतं अशी प्रतिकिया रोनाल्डो यांनी माध्यमांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 12:31 pm

Web Title: world press photo of the year image of a man ablaze during a violent protest in venezuela
Next Stories
1 फेकन्युज : बच्चन तसे म्हणालेच नाहीत!
2 फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटरला कंटाळलात? तर आता म्हणा ‘Hello’
3 एकही पैसा न घेता काम करतायेत ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी
Just Now!
X