News Flash

५ दिवसांत जगातील लठ्ठ महिलेचे ३० किलो वजन डॉक्टरांनी घटवले

मुंबईतल्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहे

Eman Ahmed : इमान हिला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक विकार जडले आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

जगातील सगळ्यात लठ्ठ महिला अशी ३६ वर्षीय इमान अहमद हिची ओळख आहे. उपचारासाठी तिला भारतात आणले असून आतापर्यंत सर्जरी करून तिचे ३० किलो वजन घटवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या वर्षांत तिचे २०० किलो वजन घटवण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे.
अकराव्या वर्षांपासून अंथरुणाला खिळल्यानंतर दैनंदिन काम करण्यासाठीही तिला आई आणि बहिणीवर अवलंबून राहावे लागे. तिला रोजची स्वच्छता, जेवण झोपलेल्या अवस्थेतच करावे लागते. अशा परिस्थितीतही इमानची बहीण शाहिमा हिने आशा सोडली नाही. तिने इजिप्तमधील अनेक डॉक्टरांच्या भेटी घेऊन इमानचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पण या फारसे यश आले नाही. अखेर तिच्या आईने तिला उपचारासाठी भारतात आणले.

Viral : ‘या’ जांभळ्या पक्ष्याला फेसबुकवरून हटवा रे!

इमान हिला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक विकार जडले आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या तिच्या अनेक सर्व आजारांवर नियंत्रण आणण्याचे काम डॉक्टर करणार आहेत. शस्त्रक्रिया करून इमान हिच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाईल. यातून पुढील ४ ते ५ महिन्यांत तिचे वजन ८० ते १०० किलोने कमी होईल, असा दावा डॉ. मुझ्झफर लकडावाला यांनी केला आहे. तिला मुंबईत आणल्या पासून पाच दिवसांत तिचे ३० किलो वजन कमी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पुढील ४ ते ५ महिन्यांत तिचे वजन ८० ते १०० किलोने कमी होईल असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

वाचा : गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या चिमुकलीला पिचईंचे ‘सुंदर’ उत्तर

इमानचे वजन ५०० किलो आहे त्यामुळे तिच्यावर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करता येणार नाही. कारण असे करणे धोक्याचे ठरेल म्हणून पुढील दोन वर्षांत तिचे किमान २०० ते २५० किलो वजन कमी केल्यानंतर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 2:12 pm

Web Title: worlds heaviest woman eman ahmed cut down 30 kg down in 5 days
Next Stories
1 आत्महत्या केलेल्या बलात्कारपीडित मुलीसाठी आईने लिहिले दु:खद पत्र
2 Viral : ‘या’ जांभळ्या पक्ष्याला फेसबुकवरून हटवा रे!
3 ‘फेसबुक’वरून आता नोकरीही शोधता येणार!
Just Now!
X