News Flash

जगातल्या सर्वात लांब वेडिंग गाऊनचं काय होणार माहितीये?

अनेकांना कुतूहल असतं

हा गाऊन इतका मोठा की त्यांची उंची एव्हरेस्टएवढी असेल असा दावा करण्यात आला आहे.

जगातला सर्वात लांब वेडिंग गाऊन फ्रान्समध्ये तयार करण्यात आला आहे. ‘कंस्ट्रक्शन कंपनी डायनामाइट प्रोजेक्ट्स’ च्या १५ कारागिरांनी मिळून या सर्वात मोठ्या लांबीचा वेडिंग गाऊन तयार केला. हा गाऊन तयार करण्यासाठी त्यांनी जवळपास दोन महिने मेहनत केली. या गाऊनची लांबी आहे ८ हजार ९५ मीटर एवढी आहे. या गाऊनच्या नावावर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद झाली.

पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन आणि त्यावर फुलांचं नाजूक नक्षीकाम करण्यात आलं आहे. या एवढ्या मोठ्या लांबीच्या वेडिंग गाऊनंचं नंतर काय होणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर एका चॅरिटीसाठी हा गाऊन वापरण्यात येणार आहे. लवकरच या गाऊनचे तुकडे करून तो कपडा विकण्यात येणार आहे आणि यातून येणारे पैसे स्वयंसेवी संस्थेला देण्यात येणार आहे. या गाऊननं २००६ चा विक्रम मोडला आहे. त्या गाऊनची लांबी १ हजार फुटांहून अधिक होती. ‘कंस्ट्रक्शन कंपनी डायनामाइट प्रोजेक्ट्स’नं तयार केलेल्या या गाऊनची उंची एव्हरेस्टएवढी असेल असा दावा करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:24 pm

Web Title: worlds longest wedding dress almost cover mt everest
Next Stories
1 बिल चुकतं न करणारे सगळेच फुकटे नसतात, ‘त्या’ तरुणांचे पत्र वाचून हॉटेलमालकाची खात्री पटली
2 Viral : प्रसूतीपूर्वी रुग्णालयात दिली परीक्षा, महिलेचा फोटो व्हायरल
3 VIDEO : अमिताभ बच्चन यांनाही आवडली स्वीडन मेट्रो स्टेशनवरची ‘ही’ डोकॅलिटी