लॅपटॉपला आपण कंप्यूटरचा लहान अवतार म्हणून ओळखतो. परंतु आता हा लहान अवतारही मोठा वाटेल इतक्या लहान लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली आहे. या संगणकाला ‘टायनी थिंकपॅड’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकन कंप्यूटर इंजिनिअर पॉल क्लिंजर यांनी या संगणकाची निर्मिती केली आहे. लेनोव्होच्या थिंकपॅडवरुन या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली, त्यामुळे याला ‘टायनी थिंकपॅड’ असे नाव देण्यात आले.

१२८ सेंटीमीटर रुंदी व ६४ सेंटीमीटर उंची असलेला हा संगणक एक गेमिंग लॅपटॉप आहे. याची स्क्रीन केवळ ०.८५ सें.मी. आहे. यात आपल्याला स्नेक, टेट्रिस आणि लुनार लँडर यांसारखे पारंपारिक गेम्स खेळता येतात. याच्या निर्मितीसाठी फक्त ८५ डॉलर इतका खर्च करण्यात आला आहे. तसेच यात ३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून यामध्ये AT tiny1614 हा मायक्रोप्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच हाय ग्राफिक गेम खेळण्यासाठी यात मायक्रोग्राफिक कार्डही वापरण्यात आले आहे. हा लॅपटॉप एका सर्वसामान्य कंप्यूटरप्रमाणेच काम करतो. या लॅपटॉपच्या किपॅडच्या मध्यभागी एक लाल रंगाचे बटण देण्यात आले आहे. जॉयस्टिक सारखे काम करणाऱ्या या बटणाच्या मदतीने यावर गेम खेळता येतात. या लॅपटॉवर अजुनही संशोधन सुरु असुन लवकरच या टायनी थिंकपॅडचे अद्ययावत व्हर्जन आपल्या समोर असेल असा दावा पॉल क्लिंजर यांनी केला आहे.