19 September 2020

News Flash

भारतामध्ये तयार होतेय जगातील सर्वात उंच शिव मूर्ती

मार्च २०१९ मध्ये अनावरण करण्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं होत. अमेरिकेतील प्रख्यात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा सरदार पटेल यांचा हा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. स्टॅचू ऑफ युनिटीची उंची १८२ मीटर उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. पण राजस्थानमध्ये भगवान शिवची मूर्ती तयार करण्यात येत आहे. याची उंची ३५१ फूट असणार आहे. शिव मूर्तीचे काम अंतिम टप्यात असून लवकरच पूर्ण होणार आहे.

महादेवाचे मंदिर संपुर्ण जगभरात आहेत. मंदिरांव्यतिरिक्त अशा काही मूर्ती आहेत ज्या खुप विशाल असण्यासोबतच सुंदरसुध्दा आहेत. राजस्थानमधील उदयपूरजवळ श्रीनाथद्वारामध्ये भगवान शिवची भव्य मूर्ती तयार करण्यात येत आहे. मार्च २०१९ मध्ये याचे अनावरण करण्यात येण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात उंच शिव मूर्ती असल्याचा दावाही करण्यात येत आहे. सध्या जगातील सर्वात उंच शिव मूर्ती नेपाळच्या कैलाशनाथ मंदिरामध्ये आहे. याची उंची १४३ फूट आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, जगातील सर्वात उंच शिव मूर्ती मिराज ग्रुप तयार करत आहे. शिव मूर्तीचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. भव्यदिव्य शिव मूर्ती तयार करण्यासाठी ३००० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन अंदाजे ३० हजार टन असेल. शिव मूर्तीची उंची ३५१ फूट असेल. भगवान शिवच्या हातातील त्रिशूल ३१५ फूट उंच आहे. मुर्तीमध्ये चार लिफ्ट करण्यात आल्या आहे. २८० फूटापर्यंत पर्यटक जाऊ शकतील अशी सोय करण्यात आली आहे.

सर्वात उंच शिव मूर्ती –
१४३ फूट – कैलाशनाथ मंदिर नेपाळ
१२३ फूट – मुरुदेश्वर मंदिर, कर्नाटक
११२ फूट – आदियोग मंदिर, तामिळनाडू
१०८ फूट – मंगल महादेव, मॉरिशस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 10:06 am

Web Title: worlds tallest shiva murti is building in india
Next Stories
1 मिकी माऊसचा जन्म सशापासून; तब्बल ९० वर्षांनंतर सापडला हरवलेला तो चित्रपट
2 नवऱ्यापासून मिळाला घटस्फोट, महिलेनं आनंदाच्या भरात पेटवून दिला वेडिंग ड्रेस
3 रूग्णांना वाचवताना गाडी जळली अन्….
Just Now!
X