नारंगी रंगाचा चुडीदार घालून जेव्हा रेसलर कविता देवी डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणात आली तेव्हा सगळेच प्रेक्षक तिच्याकडे पाहत बसले. यापूर्वी कोणत्याही रेसलरला प्रेक्षकांनी चुडीदार आणि कंबरेला ओढणी बांधून रिंगणात एण्ट्री घेताना नक्कीच पाहिलं नसेल. हा.. आता आपल्याकडे बॉलिवूडच्या चित्रपटात असं दृश्य अनेकदा पाहायला मिळतं ही वेगळी गोष्ट. पण WWE च्या एका सामन्यात रेसलर कविता देवीनं रिंगणात पारंपरिक वेषात एण्ट्री घेतली. सामन्यापेक्षा तिनं केलेल्या पेहरावानंच सगळ्याचं लक्ष अधिक वेधलं गेलं.
‘मे यंग क्लासिक’ सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. जुलै महिन्यात झालेल्या या सामान्यातले काही व्हिडिओ आता युट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत. यातला कविताचा व्हिडिओ खूपच गाजत आहे. ३४ वर्षीय कविता ही ‘ग्रेट खली’ची शिष्या आहे. ‘मे यंग’ सामन्यात तिच्यासमोर न्यूझीलंडची रेसलर डकोटा काई हिचं आव्हान होतं. डकोटासमोर कविताचा फारवेळ निभाव लागला नाही. ती पहिल्याच फेरीत सामन्यातून बाहेर पडली. ती सामना हरली असली तरी आपल्या पेहरावानं मात्र तिनं भारतीयांची मनं जिंकली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2017 5:42 pm