24 January 2021

News Flash

Video: बाजारात भन्नाट Sanitiser Spray; स्पायडरमॅनप्रमाणे मनगटाजवळून मारता येणार सॅनिटायझरचा फवारा

करोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वेअरेबल डिव्हाइज बाजारात

PumPiX Wrist Band Sanitiser Spray

करोनाच्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनिटायझर ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार हात धुण्यासंदर्भात सर्वच सरकारी यंत्रणांकडून सूचना केल्या जात आहेत. सॅनिटायझरची वाढती मागणी बघून याचा काळाबाजार सुरु झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अनेक देशांनी मागणीचा विचार करता वेगवेगळ्या क्षेत्रामधील कंपन्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी दिली आहे. मात्र सॅनिटायझरची मागणी वाढत असतानाच दुसरीकडे सॅनिटायझरसंदर्भातील इतर मागण्याही वाढताना दिसत आहेत. म्हणजेच सॅनिटायझर स्प्रे करणारी प्रवेशद्वारे, सॅनिटायझर सॅण्ड अशा गोष्टींची मागणी वाढत असतानाच एका कंपनीने मनगटाला बांधता येणारा सॅनिटायझर स्प्रे बाजारात आणला आहे.

अमेरिकेमधील पम्पिक्स (PumPiX) कंपनीने व्रीस्ट बॅण्ड सॅनिटायझर स्प्रे  (Wrist Band Sanitiser Spray) हे नवीन वेअरेबल डिव्हाइज बाजारात आणले आहे. करोनाबरोबर राहण्याची सवय आपण करायला हवी असं अनेक आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता घराबाहेर पडताना वेगवेगळ्या गोष्टींनी हात लावण्याआधी हातावर तसेच त्या गोष्टीवर सॅनिटायझर स्प्रे करण्यासाठी हा बॅण्ड वापरता येणार आहे. स्पायडरमॅन चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे स्पायडरमॅन मनगटाजवळून जाळं सोडतो त्याच प्रमाणे मनगटाजवळून एका क्लिकवर सॅनिटायझरचा स्प्रे हातावर किंवा समोरच्या वस्तूवर सोडता येणार आहे. सध्या सा स्प्रे केवळ किकस्टार्ट या अमेरिकन ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हा स्प्रे कसा वापरावा आणि त्याचा फायदा काय आहे यासंदर्भात कंपनीने एक जाहिरात युट्यूबवर पोस्ट केली आहे. यामध्ये हा स्प्रे कसा वापरावा, तो कसा रिफील करावा या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…

पम्पिक्स स्प्रेची किंमत २९ अमेरिकन डॉलर म्हणजे अंदाजे दोन हजार २०० रुपये इतकी आहे. कंपनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून या स्प्रेची होम डिलेव्हरी सुरु करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 1:16 pm

Web Title: wrist band that lets you shoot sanitiser like spider mans web scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Viral Video : बिबट्याला पुरून उरला छोटासा बेडूक
2 पारदर्शक PPE किटमध्ये लाँजरी घालून करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या नर्सवर कारवाई
3 आकाशातून पडल्या करोना विषाणूच्या आकारातील गारा; स्थानिक म्हणतात, ‘हा तर देवाचा इशारा’
Just Now!
X