17 January 2021

News Flash

“हा थट्टेचा विषय होऊ नये”, १८०० रुपयांचा हिशोब मागणाऱ्या काकूंच्या व्हिडिओवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

गेल्या काही दिवसांपासून घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला काही तरुणांना तिच्या कामाचे 1800 रुपये मागताना दिसत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियामध्ये विविध मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. अशातच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या व्हिडिओची दखल घेतली आहे. पण त्यावर त्यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये? :-
या व्हायरल व्हिडिओमध्ये घरकाम करणारी एक महिला काही तरुणांना तिच्या कामाचे १८०० रुपये मागताना दिसत आहे. त्यावर ते तरुण तिला १८०० रुपये दिले असल्याचं सांगत आहेत. पाचशे रुपयांच्या तीन नोट आणि दोनशे रुपयाची एक नोट व शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिल्याचं हे तरुण तिला वारंवार सांगतायत. त्यावर ती महिला, तुम्ही मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे असे म्हणते. पण तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मला मात्र माझे अठराशे रुपये हवे आहेत , असं म्हणत आहे. काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. काहींनी गम्मतीशीर हा व्हिडिओ पाहिला. तर काहींनी हसत हसत ‘आता मोदींना १८०० रुपयाची नोट काढावी लागेल’, अशी प्रतिक्रिया दिली. पण त्यानंतर या काकूंना न्याय मिळावा अशी पण मोहिम सोशल मीडियावर शेअर झाली. #JusticeforKaku म्हणत एक ट्रेंड सुरू झाला.

थट्टेचा विषय नाही :-
दरम्यान, या व्हिडिओवर यशोमती ठाकूर यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. “घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये”, असं ठाकूर यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. यासोबतच, “महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत”, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 9:22 am

Web Title: yashomati thakur reaction on 1800 rupees viral video sas 89
Next Stories
1 मोदींच्या ‘मन की बात’ व्हिडिओला Dislikes मिळाल्याप्रकरणी काय आहे भाजपाची प्रतिक्रिया?
2 SHOCKING! झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला साप, डॉक्टरांकडे गेली तर ….
3 ट्विटरच्या इतिहासात सर्वाधिक Like! चॅडविक बोसमन यांच्या अखेरच्या ट्विटने केली कमाल
Just Now!
X