News Flash

मुकेश अंबानी घेतात वर्षाला ‘इतका’ पगार

मालक असूनही मागील ९ वर्षांपासून पगाराच्या रकमेत बदल नाही

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी वर्षाला किती पगार घेतात माहीतीये? आता कंपनीचे मालक म्हटल्यावर ते काय पगार घेणार, असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. पण मालक असले तरीही त्यांनाही कंपनी पगार देते. आता हा पगार किती आहे हे ऐकण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तर हा आकडा आहे १५ कोटी.

मुकेश अंबानी मागच्या ९ वर्षांपासून १५ कोटी इतका पगार घेत आहेत. याशिवाय इतर भत्ते, कमिशन, लाभ मिळून त्यांना वर्षाला २४ कोटी रुपये मिळतात. रिलायन्स कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची नुकसान भरपाई जवळपास ३९ कोटींच्या जागी १५ कोटी ठरविण्यात आली होती. मुकेश अंबानी यांनी २००९ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱी पदाचा पगार निश्चित करण्याच्या बैठकीमध्ये आपला पगार १५ कोटी रुपये इतक निश्चित केला.

अंबानी यांचे चुलत भाऊ निखिल आणि मेसवानी यांचा पगार १६.५८ कोटीपर्यंत पोहोचला आहे. तर मागील वर्षी हा पगार १४.४२ कोटी आणि १४.४१ कोटी होता. तर २०१४-१५ मध्ये या दोघांचे वार्षिक उत्पन्न १२.०३ कोटी होते. याबरोबरच रिलायन्सचे कार्यकारी संचालक पी एम. एस. प्रसाद यांचे वार्षिक उत्पन्न ७.२३ कोटी इतके होते, ते वाढून ७.८७ कोटी इतके झाले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सची कामगिरी सातत्याने घसरते आहे. या घसरणीमुळे अनेक पतमानांकन संस्थांनी कंपनी कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे अनिल अंबांनी यांनी वर्षभर कंपनीकडून वेतन न घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. तर कंपनीच्या व्यवस्थापनानेही २१ दिवसांचा वैयक्तिक पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च तिमाहीमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्सला तब्बल ९६६ कोटींचा तोटा झाला होता. तर कंपनीच्या डोक्यावरील कर्जाची रक्कम ४२ हजार कोटींच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे कंपनीने डिसेंबरपर्यंत ६० टक्के कर्ज कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 12:20 pm

Web Title: yearly salary of mukesh ambani relience industries
Next Stories
1 साडी नेसली म्हणून सोहा अली खानवर सोशल मीडियावर टीका
2 Video : पाकिस्तानी गायिकेने मराठी रसिकांसाठी गायले प्रेमगीत
3 आजींचं भन्नाट डोकं! ‘गुडलक’साठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये टाकली नाणी