‘बिक गई है गॉरमिंट’ असं म्हणत पाकिस्तानी सरकारचे अक्षरश: वाभाडे काढणाऱ्या महिलेचं जीणं मुश्किल झालं आहे. २०१६ मध्ये एका पाकिस्तानी वृत्तवाहिनेने सामान्य जनतेचं सरकारविषयीचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी डोक्यात आधीच राग घालून घेतलेल्या या महिलेनं पत्रकाराला पाहताच सरकारच्या नावाने खडे फोडायला सुरू केली होती. ‘हे सगळे लोक मिळून आपल्याला ठार वेडं करणार आहेत, हे सरकार विकलं गेलंय’ असे आरोप तिने सरकारवर केले होते. आता या आरोपांत म्हणावं तसं नवीन काहीच नव्हतं म्हणा. कोणत्याही सामान्य नागरिकांना विचारलं तर सरकारबद्दल ते असंच काहीसं बोलणार तेव्हा या महिलेने फार काही वेगळं केलं नव्हतं म्हणा. पण ती ज्या पद्धतीने बोलत होती ते मात्र अनेकांना मजेशीर वाटतं होतं. एवढंच कशाला तिने अनेकदा सरकाराला या मुलाखीत शिव्याही दिला होत्या.

जाणून घ्या ‘राष्ट्रपती भवना’बद्दल काही रंजक गोष्टी

तेव्हा ‘बिक गई है गॉरमिंट’ म्हणणारी ही महिला पाकिस्तान काय पण भारतात देखील प्रसिद्ध झाली होती. तिचे मीम्स आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते, वर्ष उलटलं तरी या महिलेची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. पण या प्रसिद्धीचा तिला प्रमाणापेक्षाही जास्त त्रास होऊ लागलाय, असा आरोप तिच्या मुलांनी केलाय. या एका मुलाखतीमुळे आपल्या आईचं जगणं मुश्किल झालं असून, ती जिथे जाईल तिथे तिची टिंगल उडवत असतात असं तिच्या मुलानं म्हटलं आहे. शेजारी पाजारी देखील यावरून आपल्या आईची टर उडवतात असंही सांगितलं. यावरून अनेकदा या महिलेचे शेजाऱ्यांसोबत, नातेवाईकांसोबत खटके उडाले आहेत. याच कारणामुळे आपल्या घरी अनेकांनी येणं बंद केलं असल्याचं दु:खही त्यांनी बोलून दाखवलं. या महिलेच्या आरोपांवर तोंडसुख घेतलं असलं तरी यामुळे तिचं जगणं मात्र मुश्किल झालंय हेही तेवढंच खरं!

Video : शस्त्रक्रियेदरम्यान ‘तो’ वाजवत होता गिटार