News Flash

‘योग’ होता हत्तीवरुन पडण्याचा! रामदेवबाबांचा व्हिडीओ व्हायरल

रामदेवबाबा यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे

योगगुरु रामदेवबाबा हे हत्तीवर योगासनं करत होते. त्यानंतर काही वेळातच ते हत्तीवरुन खाली पडले. यासंदर्भातला त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होतो आहे. रामदेवबाबा खाली पडले पण त्यांना कोणतीही इजा झाली नाही. हा व्हिडीओ सोमवारचा आहे असं सांगितलं जातं आहे. तसंच मथुरा येथील रमणरेती या ठिकाणचा हा व्हिडीओ आहे. रामदेवबाबा योगाभ्यास शिकवत होते. त्यावेळी अचानक ते हत्तीवरुन खाली पडले. त्यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे.

हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनातले एक आसन शिकवत होते. त्यांचा हा व्हिडीओ मंगळवारी चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ साधारण २२ सेकंदांचा आहे. ज्यामध्ये हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनं करत आहेत. मात्र अचानक हत्ती हलला. त्यामुळे रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पडल्यानंतर काही लोक हसले त्याचा आवाजही व्हिडीओत येतो आहे.

दरम्यान या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी योगासनांमुळे काय काय फायदे होतात याची माहिती दिली. तसंच अनुलोम व विलोम आणि इतर योगांविषयीही माहिती दिली. योग केल्याने कठीणातले कठीण आजार नाहीसे होतात. लोकांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी योगासनं करायला हवीत असंही वक्तव्य त्यांनी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 8:47 pm

Web Title: yogguru ramdev baba fell near the elephant feet video viral scj 81
Next Stories
1 पक्षी की बोकड? तुम्हाला काय दिसतंय?; शबाना आझमींचं ट्विट बघाच
2 Love Jihad प्रसाराचा टाटा ब्रँडवर आरोप, जाहिरात घेतली मागे
3 नवरात्रीदरम्यान रोज घर बसल्या कमावता येणार दोन हजार रुपये?; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार
Just Now!
X