मांजरीची पिल्ले समजून बिबट्याचे बछडे पाळण्याची चूक आंध्रामधल्या आदिवासी पाड्यातील एका मुलाने केली. आश्चर्य म्हणजे ही मांजरीची पिल्ले नसल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. शेजारांच्या नजरेस जेव्हा पिल्ले पडली तेव्हा ती मांजरीची पिल्ले नसून बिबट्याचे बछडे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शेवटी या पिल्लांना आदिवासी लोकांनी पुन्हा जंगलात सोडून दिले.

वाचा: भेटा जगातील सगळ्यात सुखी प्राण्याला

वाचा: मुंबई ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत नगरी

आंध्रमधल्या पडेरु येथे राहणा-या सहा वर्षांच्या आदिवासी मुलाला झुडपात बिबट्याची दोन बछडी आढळली. ती मांजरीची पिल्ले आहेत असे समजून त्याने ती घरी आणली. या पिल्लांना काही दिवस त्याने खेळवले, दुध आणि अन्नही भरवले. पण आपल्या जवळ असलेली ही पिल्ले मांजरीची नसल्याचे त्याच्याच काय पण कुटुंबियांच्याही लक्षात आले नाही. एके दिवशी शेजा-यांना ही मांजरीची पिल्ले नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या पिल्लांना जंगलात सोडून येण्याचे सांगितले. त्यानंतर वनाधिका-यांनी ही पिल्ले ताब्यात घेतली असल्याचे बंगलोर मिररने म्हटले आहे. या पिल्लांना वनाधिका-यांनी जंगलात सुखरुप सोडले आहे. जर या बछड्यांच्या आईला  त्यांचा सुगावा लागला असता तर मात्र मुलावर तिने हल्ला केला असता असेही वनाधिका-यांनी सांगितले.

वाचा: नोकियाचा ‘स्नेक गेम’ फेसबुकवरही येणार