News Flash

काम, घरी बसणे, महिन्याला आठ लाख पगार

ज्याची कल्पनाही केली नव्हती असं झालं.

प्रातिनिधीक छायाचित्र

जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जो आपल्याला पैसे नको असं म्हणेल. अशाच एका तरूणाला एक मोठी लॉटरीच लागली आहे. काम न करता त्या तरूणाला आता महिन्याला आठ लाखांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे. ते एखाद महिन्यासाठी वगैरे नाही, तर तब्बल 30 वर्षांसाठी. अशाप्रकारची लॉटरी जिंकणारा तो एकमेव तरूण आहे. डीन असे त्या तरूणाचे नाव असून तो ब्रिटनचा रहिवासी आहे.

डीनला दर महिन्याला तब्बल 8.6 लाख रूपये दर महिन्याला मिळणार आहेत. लॉटरी जिंकल्यानंतर त्यानेदेखील आपले अनेक प्लॅन सांगितले आहेत. तसंच त्याने आता आपण सुट्टी एन्जॉय करणार असल्याचं सांगत काही पैशांनी आपल्या भावाला मदत करणार असल्याचं सांगितलं. 30 जुलै रोजीच डीनला आपल्याला लॉटरी लागल्याची माहिती मिळाली. त्यादरम्यान तो ऑफिसमध्ये काम करत होता. तसंच आपल्याला एका दिवसापूर्वीच लॉटरी लागली आहे, याची कल्पनादेखील त्या नव्हती.

ब्रिटनमधील पीटरबोरोघ येथे राहणाऱ्या डीनने आयर्लंडमधून व्हिडीओ आणि फिल्मचं शिक्षण घेतलं आहे. तसेच आतापर्यंत तो अॅमेझॉनसोबत काम करत होता. परंतु आता आपण अधिक क्रिएटिव्ह काम करू शकतो, असे तो म्हणाला. तसेच आपली आर्थिक स्थिती आता उत्तम होणार असून आपली स्वप्नही पूर्ण करू शकतो, असेही तो म्हणाला. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच त्याने एक डॉक्युमेंट्रीही तयार केली होती. ती डॉक्युमेंट्री मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यानं स्क्रिप्ट रायटर म्हणून केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 3:10 pm

Web Title: youngster from britain won 8 lakh per month lottery for next 30 years jud 87
Next Stories
1 तुम्ही कधीही पाहिला नसेल असा ‘गेमिंग लॅपटॉप’ !
2 … म्हणून त्यानं चालवली प्लॅटफॉर्मवर रिक्षा; कोर्टानंही केलं माफ
3 सुषमांची ‘लव्ह स्टोरी’ : स्वराज हे त्यांचं खरं आडनाव नव्हेच !
Just Now!
X