25 October 2020

News Flash

Video : चहलची होणारी बायको धनश्री म्हणते…परी हु मै !

यु-ट्यूबवर पोस्ट केला खास व्हिडीओ

टीम इंडियाचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्रतिनिधीत्व करणारा युजवेंद्र चहल लवकरच लग्न करणार आहे. युएईला रवाना होण्यापूर्वी चहलचा धनश्री वर्मा या कोरिओग्राफरसोबत पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पडला. यानंतर सोशल मीडियावर चहल आणि धनश्री यांची जोडी चांगलीच फेमस झाली आहे. चहल आणि धनश्री आपल्या सोशल मीडियावर गमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी चहलला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर धनश्रीने टिव्हीसमोर आपल्या खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. सोशल मीडियावर धनश्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत.

आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात प्रत्येक जण गरबा खेळण्यासाठी उत्सुक असतो. परंतू यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरबा खेळण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे उत्तम डान्सर असलेल्या धनश्रीने आपल्या मैत्रिणीसोबत…मैने पायल हे छनकाई, परी हु मै या दोन गाण्यांवर गरबा खेळतानाचा व्हिडीओ अपलोड केला आहे.

पंजाबविरुद्ध सामन्यात RCB ला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र यंदाच्या हंगामात RCB ने आश्वासक कामगिरी करत इतर संघांच्या तुलनेत आश्वासक कामगिरी केली आहे. युजवेंद्र चहलनेही आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सुरेख कामगिरी करत मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. त्यामुळे यापुढे RCB ची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 3:55 pm

Web Title: yuzvendra chahals fiance dhanashree vermas dreamy garba performance will set your navratri mood right away psd 91
Next Stories
1 महिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये?; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार
2 अल्बर्ट आइनस्टाइनसोबत असणारी ही मराठमोळी व्यक्ती कोण ओळखलंत का?
3 …म्हणून आनंद महिंद्रा बासरीवाल्याकडून दर रविवारी एक बासरी विकत घेऊन तोडायचे
Just Now!
X