झी मराठी वाहिनीवर लागणारी अग्गंबाई सासुबाई या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या ही पात्र आता सर्वसामान्य मराठी कुटुंबाच्या घरातली झाली आहेत. आसावरी आणि अभिजीत राजे यांचं लग्न झाल्यानंतर आसावरीच्या मुलाची भूमिका करणारा आशुतोष पत्कीही चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. मात्र आपल्या आईचं अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्याशी झालेलं लग्न बबड्याला मान्य नसल्यामुळे तो सारखा तिला त्रास देत असल्याचं दाखवत आहे.
सोशल मीडियावर एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ज्यात एक मालवणी आजीबाई बबड्या आपल्या आईला त्रास देतो म्हणून तिच्यावर संतापलेल्या दाखवल्या आहेत. बबड्या डँबिस आहे, त्याला घरातून चालता हो म्हणावं असं म्हणत आजीबाई आपल्या संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाहा आजीबाईंचा हा रुद्रावतार…
मध्यंतरी या मालिकेत आसावरीची भूमिका करणाऱ्या निवेदीता सराफ यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे काही दिवसांसाठी त्यांनी शुटींग थांबवलं होतं. परंतू करोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर निवेदीता सराफ यांनी पुन्हा एकदा शुटींगला सुरुवात केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 5:03 pm