News Flash

Social Viral : झिम्बाब्वेच्या गोलंदाजाचं हे सेलिब्रेशन पाहून तुम्ही सुद्धा गोंधळून जाल

यापूर्वीही त्याने अनेकदा विकेट घेतल्यानंतर अशापद्धतीने आनंद साजरा केलाय आणि जेव्हा जेव्हा त्याने असा जल्लोष केलाय तो चर्चेत आलाय

हे सेलिब्रेशन सध्या चर्चेत आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार)

बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर झिम्बाब्वेचा एकदिवसीय मालिकेमधील पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. या सामन्यामध्ये बांगलादेशला विजय मिळवून देण्यामध्ये संघाचा सलामीवर लिटन दासची खेळी महत्वपूर्ण ठरली. दासने शानदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. दासने ११४ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. त्यामुळे बांगलादेशच्या संघाने ५० षटकांमध्ये नऊ गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा सर्व संघ २८.५ षटकांमध्ये १२१ धावांवर बाद झाला. या सामन्यानंतर दासच्या शतकाचं कौतुक होत असलं तरी त्याचबरोबर झिम्बाब्वेचा गोलंदाज रिचर्ड नगारवाने केलेलं एक अनोखं सेलिब्रेशनही सोशल नेटवर्किंगवर चांगलच चर्चेत आहे.

झालं असं की नगारवाने बांगलादेशचा फलंदाज मोसदेक हुसैनला बाद केल्यानंतर हे अनोखं सेलिब्रेशन केलं. विकेट घेतल्यानंतर नगारवाने आपल्या पायातील एक बूट काढला आणि तो मोबाइल असल्याप्रमाणे कानाला लावून त्यावर बोलण्याचा अभिनय करु लागला. त्याने बूट काढला, त्यावर नंबर डायल करायचा अभिनय केला आणि तो बूट कानाला लावला. सोशल नेटवर्किंगवर सध्या नगारवाचं हे जगावेगळं सेलिब्रेशन फार व्हायरल झालं आहे. नगरवाने आपल्या १० षटकांमध्ये ६१ धावा देत दोन मुख्य फलंदाजांना बाद केलं. विशेष म्हणजे मोसदेकसोबतच नगरवाने शानदार शतक झळकावणाऱ्या दासलाही तंबूत पाठवलं. नगारवाने यापूर्वीही अनेकदा अशापद्धतीने विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा केलाय.

एप्रिलमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने असं सेलिब्रेशन केलं होतं.

या सामन्यामध्ये दाससोबतच अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसननेही सुंदर गोलंदाजी केली. शाकिबने अवघ्या ३० धावांच्या मोबदल्यात झिम्बाब्वेचा अर्धा संघ बाद केला. या विजयासोबतच बांगलादेशने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये १-० ने आघाडी मिळवील आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रॅडन टेलरचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. मात्र या सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये १२१ धावांपैकी ५४ धावा तर झिम्बाब्वेचा विकेटकिपर रेजिस चकाब्वाने केल्या होत्या. झिम्बाब्वेच्या संघाने आपल्या शेवटच्या पाच विकेट्स तर अवघ्या १६ रनांच्याम मोबदल्यात गमावल्या. या सामन्यामध्ये शानदार शतक ठोकणाऱ्या दासला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 1:12 pm

Web Title: zimbabwe vs bangladesh luke jongwe call up celebration scsg 91
Next Stories
1 Flash Mob Video : “मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद”
2 कौतुक मोदींनी स्वत:ची छत्री स्वत: पकडल्याचं… मनमोहन सिंग, राहुल गांधींचे जुने फोटोही झाले व्हायरल
3 टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलीट्साठी ‘anti-sex’ बेड्स; नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया!
Just Now!
X