भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची चिमुकली राजकुमारी नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. म्हणूनच झिवा आता सोशल मीडियावरची नवी स्टार ठरली आहे. मल्याळममध्ये भक्तीगीत गाणारी झिवा, आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, कॅप्टन कूलसोबत लाडू फस्त करणारी झिवा… असे तिचे नाना तऱ्हेचे अंदाज नेहमीच सगळ्यांना भावतात. यावेळी ही चिमुकली तिच्या नव्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

झिवा स्वयंपाक घरात आपल्या आईसोबत पोळ्या लाटत होती. कौतुकाची गोष्ट म्हणजे तिनं अगदी गोल पोळी लाटली होती. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. पोळ्या लाटण्यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या झिवाचा हा नवा व्हिडिओ सगळ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.
झिवाची वाढती फॅन फॉलोअिंग लक्षात घेता तिच्यासाठी वेगळं इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. सध्या झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सची सध्या ही ९५ हजारांहून अधिक आहे.

https://www.instagram.com/p/Bb1-o0BH1Cc/