सध्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून घर बसल्या खाद्यपदार्थ मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. आज बाजारामध्ये झोमॅटो, स्वीगी, उबर इट्स, फूड पांडा यासारखे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. खास ऑफर्स आणि घर बसल्या घरी पदार्थ आणून देण्याची सोय यामुळे या अॅप्सचा वापर दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. या अॅप्समुळे डिलेव्हरी बॉइजची मागणी वाढली आहे. त्यामुळेच अनेक तरुण डिलेव्हरी बॉय म्हणून अशा अॅप्लिकेशन्ससाठी नोकरी करताना दिसत आहे. हे डिलेव्हरी बॉइज अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या असाच एक डिलेव्हरी बॉय सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे तो म्हणजे हरियाणातील कर्नाल येथील सुरज. सुरजने डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत थोडे थोडे पैसे जमवून ड्रीम बाईक घेण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनीच ट्विट करुन सुरजच्या या प्रत्यक्षात अवतरलेल्या स्वप्नाबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही कष्ट केले, काम केले तर तुमचे स्वप्न पुर्ण करणे सहज शक्य आहे, तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे. सुरजने घेतलेल्या केटीएम आरसी २०० या बाईकबद्दल बोलताना गोयल आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'आमच्या कर्नाल टीममधील हा सुरज. मागील पाच महिन्यापासून तो त्याच्या स्वप्नातली बाईक घेण्यासाठी पैसे वाचवत होता. जर तुम्ही त्याला या सुपरकूल बाईकवर पाहिले तर नक्की हात दाखवा.' पुढे त्यांनी झोमॅटोशी संबंधित अनेकांच्या प्रेरणादायी कथा असल्याचे म्हटले आहे. 'झोमॅटो डिलेव्हरी युनिव्हर्समधील अनेक प्रेरणादायी कथांपैकी ही एक आहे. यशाच्या मार्गावर जाण्यासाठी ज्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे त्यांच्या कथा आहेत या,' असं गोयल म्हणतात. Suraj, from our Karnal (Haryana) team, saved for 5 months to buy his dream bike. If you spot him on his supercool ride, do wave. This is one of the many inspiring stories from @Zomato Delivery Universe – about folks who celebrate by staying focused on the road to success. pic.twitter.com/TiSHMMNzxk — Deepinder Goyal (@deepigoyal) July 1, 2019 गोयल यांच्या या ट्विटवर अनेकांनी सुरजचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी मात्र डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सुरजने पाच महिन्यांच्या पगारामध्ये एवढी महाग बाईक कशी काय घेतली असा सवाल उपस्थित केला आहे. तर काहींनी झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉइजला असा किती पगार आहे असा सवालही गोयल यांनी केला आहे. पाहुयात काही व्हायरल ट्विट. दोन वर्ष कॉर्परेटमध्ये काम करुन मला कपडे परवडत नाहीत 5 month mein bike le li, I've been working in corporate for 2 years now and couldn't afford things at @myntra end of reason sale. #corporatekachra — vishnu nambiar (@vishnuthedb9) July 1, 2019 जरा अती झालं Zyada ho gya — Arif Hussain (@ArifHus82597559) July 2, 2019 पाच नसेल पंचवीस महिने असेल Sir,@deepigoyal you have gone wrong somewhere.I think it's not 5 months, it's 25 months. Do not send a wrong message to the public in this way. — S.K.Mondal (@SKm_ASn) July 2, 2019 हिशोब Average Zomato Delivery person earns 15000 per month approx , which in 5 months = 75000. KTM bikes starts from 1.3 Lakhs onwards . — Trump Yuva Vahini (@trumpYuvaVahini) July 1, 2019 दोन वर्षात झोमॅटोच घेईल 2 saal aur ruko Ye zomato khaird lega londa..! — Tushar (@Sarcasm_and_YOU) July 2, 2019 पाच वर्षात ऑडी फोर U mean if he works for another 5 years he will deliver food in an Audi A4. — Varun Thakkar (@varunthakkar156) July 3, 2019 त्याला एवढा पगार आहे 212000/5 = 42400 Is he earing 50k+ ? Time to quit my job — AKIL (@iamakilok) July 1, 2019 पगार किती Bought a bike after saving for five months? How much is his salary? — Tilak (@timukh) July 1, 2019 आता केटीएमवर डिलेव्हरी देणार का? Is it really feasible to deliver food in the city on KTM.. — Nishil (@NishilBright) July 1, 2019 दरम्यान, केटीएम आरसी २०० या बाईकची बाजारातील किंमत १ लाख ८० हजार १ लाख ते ९२ हजारच्या दरम्यान आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी सुरजच्या पगाराची इतकी चौकशी केल्याचे चित्र दिसत आहे.