आठवड्याभरापूर्वी एका जाहिरात फलकावरून ‘झोमॅटो हे अॅप सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. एका जाहिरातीत त्यांनी ‘बी.सी.’, ‘एम.सी’ असे शब्द वापरले होते. ज्यांचा अर्थ काहीतरी भलताच निघत होता. अर्थात झोमॅटोनं मोठी शक्कल लढवत दोन अर्थांनी या शब्दांचा वापर केला होता, त्यामुळे टीका झाल्यानंतर योग्य ती सबब पुढे करत झोमॅटोनं या वादातून काढता पाय घेतला.

आता झोमॅटोनं शक्कल लढवत आणखी हटके जाहिरात केली आहे. या जाहिरातबाजीवर भले इतर कोणी खूश नसलं तरी गायक अनू मलिक मात्र भलताच खूश झाला आहे. ‘उँची है बिल्डिंग? लिफ्ट तेरी बंद है? we will still deliver in time’ अशी जाहिरात झोमॅटोनं केली आहे. ‘तुमची इमारत उंच आहे, लिफ्ट देखील बंद आहे? पण, काही हरकत नाही. ऑर्डर दिल्यानंतर आम्ही जेवण वेळेतच पोहोचवू’ अशा आशयाचं हे ट्विट होतं. ‘जुडवा’ सिनेमातल्या गाण्याचा असा हा भन्नाट वापर करून जाहिरातबाजी केलेली पाहून अनू मलिक भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी हे पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून या जाहिरातीमागच्या कल्पकतेचं कौतुक केलं आहे.

Viral Video : ‘हा’ अफलातून डान्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल

घर, दुचाकी आणि ती; वर्षभरात दाना मांझीचे आयुष्यच बदललं

जवळपास असणाऱ्या एखाद्या हॉटेलबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तिथल्या पदार्थांची चव आणि सर्व्हिसबद्दल माहिती हवी असेल, पदार्थ मागवायचे असेल तर अनेकांची पसंती झोमॅटो अॅपला असते. मात्र गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपल्या नव्या जाहिरातीत झोमॅटोनं ‘बीसी.’, ‘एमसी.’ असे शब्द वापरले होते. या शब्दांचा अर्थ ‘मॅक अँड चीज’ आणि ‘बटर चिकन’ असा होतो असं झोमॅटोचं म्हणणं होतं. पण, अनेकांना याचा अर्थ काय आहे हे माहिती असल्यानं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. लेखक सुहेल सेठ यांनीही झोमॅटोबद्दलचा राग व्यक्त करत ही जाहिरात अत्यंत लाजिरवाणी आहे असं म्हटलं होतं. ही बाब त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्याही निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर झोमॅटोनं ही जाहिरात काढून टाकली होती.