नोकरी करणारा प्रत्येकजण महिन्याच्या अखेरीस आपल्या पगाराची आतुरतेने वाट पाहत असतो. या पगारासाठीच प्रत्येक कर्मचारी महिनाभर काम करत असतो आणि या पगारातून त्याचा पुढील महिन्याचा खर्च भागणार असतो. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूप जास्त मेहनत करावी लागते. म्हणूनच त्यांना येणाऱ्या पगाराचे महत्त्व माहित असते.

कंपनीकडून पगाराचे वाटप होताच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. प्रत्येकालाच असे वाटते की जर आपल्या खात्यात आपल्या पगारापेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर? अर्थात ही फक्त कल्पनाच करता येण्यासारखी गोष्ट आहे. पण असा एक व्यक्ती आहे ज्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. नुकतीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका कर्मचाऱ्याला कंपनीने हजारो-लाख नाही तर चुकून एक कोटींहून अधिक पगार दिला. कर्मचाऱ्याला चुकून त्याच्या वेतनाच्या २८६ पट पगार देण्यात आला.

अभिमानास्पद! मुलाची बारावीची गुणपत्रिका प्रवाशांसोबत शेअर करताना रिक्षाचालक बापाचा आनंद गगनात मावेना

या घटनेनंतर काय झाले असावे हा प्रश्न आपल्या सर्वानाच पडला असेल. तर ही घटना घडल्यावर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. त्याच्या कंपनीला जादा भरलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन तो बेपत्ता झाला. चिलीमधील सेसिनास ही सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी कर्मचार्‍यांचे पगार ट्रान्सफर करत असताना एवढी मोठी चूक झाली. स्थानिक मीडियानुसार, कंपनीने चुकून कर्मचार्‍यांना ५००,००० पेसो (४३ हजार रुपये) ऐवजी १६५,३९८,८५१ चिली पेसो (रु. १.४२ कोटी) दिले.

ही संपूर्ण घटना फूड इंडस्ट्रियल कन्सोर्टियम (Cial) च्या एचआर सेक्टरमध्ये घडली. ही एक कंपनी आहे जी सॅन जॉर्ज, ला प्रीफेरिडा आणि विंटर सारख्या महत्त्वाच्या चिली ब्रँड्सवर नियंत्रण ठेवते.