Chanakya Niti These 10 things will change your life : यश, अपयश, सुख आणि दुःख या गोष्टी आपण अनेकदा नशिबाशी जोडतो. पण, प्रत्यक्षात आपल्या विचारांमुळे, निर्णयांमुळे आणि रोजच्या सवयींमुळेच आयुष्याची दिशा ठरते. चांगल्या सवयी माणसाला यशाच्या जवळ नेतात, तर वाईट सवयी प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. फक्त नशिबाची वाट पाहून काहीच बदलत नाही. तर परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे असते. मेहनत, सकारात्मक विचार, शिस्त आणि योग्य निर्णय यांमुळेच आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळते. जे लोक संकटांमध्येही हार मानत नाहीत आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात, त्यांच्याच पदरात खरे यश येते.

याचबद्दल आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नितीमध्ये काही गोष्टी लिहिल्या आहेत; ज्या आजही तितक्याच समर्पक आहेत. जो कोणी चाणक्याच्या धोरणांचे पालन करतो, त्याच्या सर्व समस्या आपोआप नाहीश्या होतात. त्याची धोरणे जीवनाचे अनेक मौल्यवान धडे देतात. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये लिहिलेल्या अशा १० गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील.

१. तुम्ही वेळ थांबवू शकत नाही, पण वेळ वाया न घालवणे तुमच्या हातात असते.

२. ज्यांना ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे, त्यांना वाणी, मन आणि इंद्रियांची शुद्धता आणि करुण हृदयाची गरज असते.

३. डोळ्यात प्रेम, आदराने वाकलेले मस्तक, सहकार्य करणारे हात, सरळ मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेली जीभ या ईश्वराच्या आवडत्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही अंगिकारल्या पाहिजेत.

४. तुमची गुपिते कोणालाही सांगू नका. कारण – एकेदिवशी हेच तुमचा नाश करतील. त्यामुळे हा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे.

५. चांगल्या काळापेक्षा, चांगल्या लोकांशी नातं जोडून ठेवा. एक माणूस चांगला काळ तुमच्या जीवनात घेऊन येऊ शकतो. पण, एखादा काळ चांगल्या लोकांना तुमच्या आणू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

६. विसाव्या वयातील चेहरा हा निसर्गाची देणगी असतो. ३० व्या वर्षी चेहऱ्यावर जीवनातील अनुभव, संघर्ष आणि आनंद-दुःख यांचा प्रभाव दिसू लागतो. पण, ५० व्या वर्षी चेहऱ्यावर दिसणाऱ्या गोष्टी आयुष्यभराच्या कर्मांची कमाई असतात.

७. प्रत्येक नवीन सुरुवात थोडी भीतीदायक असते. पण, लक्षात ठेवा! यश हे अनेकदा अडचणीं,मधूनच सापडते.

८. जेव्हा अनेक कामे समोर येऊन उभी राहतात. तेव्हा जे काम सर्वात जास्त परिणाम देईल ते सगळयात जास्त करण्याचा आधी प्रयत्न करा.

९. शहाण्या माणसाने बगळ्याप्रमाणे हुशारीने आणि जागा, वेळ व आपली क्षमता ओळखून आपले काम पूर्ण करावे.

१०. आयुष्याबद्दल विचार करताना नेहमी लक्षात ठेवा की, पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य घडवू शकत नाही. केवळ एकाग्रतेने केलेले कठोर परिश्रमच खरे चमत्कार घडवून आणता.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)