AI-based eye disease detection app: सध्या भारतासह जगभरामध्ये डोळ्यांशी संंबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार सुरु असताना गंभीर आजारांवरसुद्धा मात करता येते. पण त्यासाठी त्या आजाराचे निदान होणे आवश्यक असते. योग्य वेळी निदान न झाल्याने बहुतांश रुग्णांची दृष्टी जाते. ही समस्या ओळखून लीना रफीक या ११ वर्षांच्या मुलीने डोळ्यांच्या आजारांचे निदान करणाऱ्या AI-based app तयार केला आहे.

लीना सध्या दुबईमध्ये राहते. तिचा जन्म केरळमध्ये झाला होता. तिला विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड आहे. ही आवड जोपासतानाच तिने ‘ओग्लर आयस्कॅन’ (Ogler EyeScan) हे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये एका विशिष्ट स्कॅनिंग प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने डोळ्यांच्या स्थितीबाबत माहिती मिळवता येते. त्यासह Arcus, Melanoma, Pterygium आणि Cataract अशा काही डोळ्यांच्या आजारांचे निदान देखील करता येते. आजार ओळखणे आणि डोळ्याच्या स्थितीची सविस्तर माहिती देणे यामध्ये या अ‍ॅपचा Accuracy rate ७० टक्के आहे अशी माहिती समोर आली आहे.

Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
Mrunal Dusanis shared a shocking experience
मालिकेच्या निर्मात्याने थकवलेले पैसे, मृणाल दुसानिसने चार वर्षांनी ‘त्या’ घटनेवर केलं भाष्य, म्हणाली, “मी हळवी होऊन…”
Viral Video Indian family welcome daughter Foreigner Boyfriend With Traditional Rituals in Heartwarming Video
भारतीय कुटुंबाने लेकीच्या परदेशी प्रियकराचं केलं हटके स्वागत; फुलांचा केला वर्षाव अन्… पाहा हृदयस्पर्शी VIDEO
marathi actor Shashank Ketkar After many months, went to Pune home with his wife and son video viral
Video: बऱ्याच महिन्यांनी शशांक केतकर पत्नी व मुलासह गेला पुण्याच्या घरी, मारला सालपापडीवर ताव; पाहा व्हिडीओ

अ‍ॅप स्टोअरवर हे अ‍ॅप दाखल करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ११ वर्षीय लीना रफीकने लिंकडेनवर तिच्या अ‍ॅपबद्दल आणि एकूण प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती शेअर केली. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांना या लहान मुलीचे कौतुक करत तिला शाबासकी दिली आहे. बऱ्याच जणांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया कळवल्या आहेत. ओग्लर आयस्कॅनव्यतिरिक्त लीनाने ‘लहनास’ (Lahnas) ही वेबसाइट देखील तयार केली आहे. लहान मुलांना प्राणी-पक्षी, रंग आणि शब्द यांचा अभ्यास करताना या वेबसाइटची मदत होऊ शकते.

आणखी वाचा – Aadhaar-Pan Link करण्यासाठी घ्या स्मार्टफोनची मदत; पॅन कार्डची Validity टिकून राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

लीनाची बहीण हाना रफीकदेखील App developer आहे. ९ वर्षांची असताना हाना अ‍ॅप तयार करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती ठरली होती. अ‍ॅप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांची भेट घेण्याची संधी हानाला मिळाली होती.