viral video parents stand outside exam centre : आपल्या मुलांना शाळेत टाकल्यावर पालकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणखीन वाढ होते. त्यामुळे शिक्षणादरम्यान प्रत्येक पाऊल त्यांना लक्षपूर्वक टाकावे लागते. त्यातच बोर्डाच्या परीक्षा असतील तर विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही कसून मेहनत करावी लागते. त्यांना अभ्यास करताना त्रास होणार नाही याची काळजी, त्यांना वेळेत जेवण, नाश्ता मिळावा यासाठी मेहनत तर परीक्षा हॉलवर वेळेत पोहचण्यासाठी धडपड सुरु असते. ही सगळी पालकांची मेहनत कुठेतरी लपून राहते. तर आज तीच मेहनत व्हिडीओद्वारे सगळ्यांसमोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. यादरम्यान पालकांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पालक परीक्षा केंद्रापर्यंत मुलांना सोडायला आले होते. विद्यार्थी आतमध्ये जाताच पेपर सुरु होण्यापासून ते अगदी पेपर संपेपर्यंत काही पालक अगदी ३ ते ४ तास परीक्षा केंद्राबाहेर उभे राहिले आहेत. इन्स्टाग्राम युजरने हे पहिले आणि याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
४ तासांहून जास्त वेळ परीक्षा हॉलच्या बाहेर (Viral Video)
ट्रेन, बस अगदी मेट्रो वेळेत आली नाही की, आपली चिडचिड होते. पण, परीक्षा केंद्राबाहेर ३ ते ४ तास बाहेर उभे राहणाऱ्या पालकांचा विचार करा. कोणताही राग, चिडचिड मनात न ठेवता फक्त लेकरांसाठी भर उन्हात उभे असतात. “पालकांचे न दिसणारे आणि लक्षात न येणारे प्रयत्न” आज या व्हिडीओद्वारे पुन्हा बघायला मिळाले. असंख्य पालक आपल्या लेकरांचा पेपर चांगला जाऊदेत अशी प्रार्थना तर पेपर लिहून आपला मुलगा-मुलगी कधी परत येतील याची वाट बघताना दिसत आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @cringeofahad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “मी परीक्षा हॉलमध्ये सोडून निघून जात होतो. तेव्हा माझ्या धाकट्या बहिणीने सर्वांसमोर माझे पाय स्पर्श केले. मला खूप अभिमान वाटला”, “जर एवढा सपोर्ट करता. मग तुम्ही माझ्याबद्दल इतके वाईट का बोलता की तुमची स्वतःची मुले पूर्णपणे तुटून पडतात”, “पालक ४ तासांहून जास्त वेळ परीक्षा हॉलच्या बाहेर उभे राहतात. पण, असं प्रत्येकालाच जमत नाही”, “आयुष्यातला सर्वात भितीदायक आणि अपराधी वाटणारा भाग” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…

