scorecardresearch

Viral Video: १४ फूट लांब किंग कोब्रा हाताने पकडला; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

साप बाजूने जरी सरपटत गेला बोबडी वळते. भीतीने ती वाट सोडून आपण दुसरीकडून जाणं पसंत करतो.

King_Cobra
Viral Video: १४ फूट लांब किंग कोब्रा हाताने पकडला; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप (Photo- Viral Video Grab)

साप बाजूने जरी सरपटत गेला बोबडी वळते. भीतीने ती वाट सोडून आपण दुसरीकडून जाणं पसंत करतो. मात्र काही लोक सापाला जराही घाबरत नाहीत. सापाजवळ जातात किंवा त्याला हाताने पकडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ थायलंडमधील आहे. व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती सापाला पकडताना दिसत आहे. या दरम्यान साप त्याला चावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र साप पकडणारा व्यक्ती यापासून स्वत:चा बचाव करत आहे.

समाचार वेबसाइट थाइगरच्या मते, दक्षिण थायलंडमधील क्राबीमध्ये स्थानिक लोकांनी १४ लांब किंग कोब्रा ताडाच्या शेतीत घुसताना पाहिला. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. साप एका सेप्टिक टँकमध्ये लपण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तात्काळ काही कर्मचारी सर्पमित्रासोबत तिथे पोहोचले. एओ नांग सबडिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह संघटनेचा कार्यकर्ता सुती नवादने २० मिनिटं शर्थीचे प्रयत्न करून साप पकडला. ४० वर्षीय नवादने सापाला पहिल्यांदा मोकळ्या रस्त्यावर कसंबसं आणलं. त्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. शर्थीचे प्रयत्न करून अखेर सापाला पकडण्यात यश आलं.

किंग कोब्रा सापाची लांबी १४ फूट असून वजन १० किलो आहे. किंग कोब्राला पकडल्यानंतर एका जंगलात सोडलं आहे. किंग कोब्रा सर्वात विषारी असून दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात आढळून येतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 feet long king cobra catch in thailand rmt